covid death in nagpur

नागपूर. गत काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आजारावर मात करीत असल्यामुळे बरे होणाऱ्यांची टक्केवारी वाढली आहे. परंतु दररोज कोरोनाबाधितांचे मृत्यूसुद्धा (covid death) मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे चिंता कायम आहे. मृत्यूदर कमी करण्यात अद्यापही यश आलेले नाही. रविवारी ५४ संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनाने २०४४ लोकांचा बळी घेतला आहे. गत दोन महिन्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण वेगाने वाढत आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, संक्रमित रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी उशिरा पोहोचत असल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बाधित व्यक्‍तीने वेळीच तपासणी केल्यास डॉक्टरांकडून अथवा कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास ते आजारावर सहज मात करू शकतात. रविवारी जिल्ह्यात ५७३२ नमुन्यांची तपासणी केली. यापैकी १२२६ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. यासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ६३७५७ झाली आहे. यात ५०६७५ रुग्ण शहरातील तर १२७१६ रुग्ण ग्रामीण भागातील आहे. याशिवाय ३६६ रुग्ण जिल्ह्याबाहेरीळ आहे.

१६१० रुग्णांची कोरोनावर मात रविवारी १६१० रुग्णांनी कोरोवर मात केल्यामुळे ते घरी परतले. त्यांचा वेगवेगळ्या हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होता. जिल्ह्यात आतापर्यंत ५१५५६ लोकांनी कोरोनावर मात केळी आहे. यात शहरातील ४२२५८ तर ग्रामीण भागातील ९२५८ रुग्णांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत आहे. जिल्ह्यात रिकव्हरी रेटसुद्धा वाढला आहे. सध्या जिल्ह्यात १०१५७ अँक्टिव्ह केसेस आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहे. यात शहरात ५५७० तर ग्रामीण भागात ४५८७ रुग्ण उपचार घेत आहे. रविवारी आढळलेल्या १२२६ पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये एम्सच्या लॅबमधून ८४, मेडिकळ ६, मेयो ३५, नीरी ६१, खासगी लॅब्स ४७४, अन्टिजेन टेस्टमध्ये ५६६ रुग्णांचा समावेश आहे. आजही नागरिक सरकारीऐवजी खासगी लॅबमध्ये मोठ्या प्रमाणात तपासणी करीत आहे.

सतर्कता बाळगणे आवशयक
शहरात लॉकडाऊनमध्ये शियिलता दिल्यानंतर जे चित्र दिसत आहे, ते कोरोनाचा प्रकोप वाढण्यास कारणीभूत आहे. प्रत्येक चौक, फुटपाथ, सरकारी कार्यालयांसमोर व आजुबाजुला चहा, नाश्ता सेंटरवर प्रचंड गर्दी दिसत आहे. केवळ पार्सल सुविधेची 'परवानगी असतानाही लोक तेथेच चहा- नाश्ता करताना दिसत आहे. अशा ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसून दुकानदार व ग्राहकांकडून मास्कचा वापरसुद्धा होताना दिसत नाही. तसेच दुकानदाराकडून ग्लब्स घातले जात नाही. प्रशासनासह डॉक्टर्स व लोकप्रतिनिधी वारंवार कोविड संदर्भात देण्यात आलेल्या दिशा-निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन करीत आहे. परंतु जनता याकडे दुर्लक्ष करीत आहे. हीच बाब अंगलट येत आहे. अद्यापही कोरोनाचे कोणतेही औषध उपलब्ध झाले नाही. त्यामुळे सतर्कता बाळगणेच एकमेव उपाय आहे. वाढते संक्रमण लक्षात घेता कोरोनाचा सामूहिक प्रसार होत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.