नागपूर जिल्ह्यात मंगळवारी आढळले २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; रुग्णांच्या आकडेवारीचा आलेख स्थिर

नागपूर (Nagpur). शहरात कोरोनाची दुसरी लाट (After the second wave of corona) संपल्यानंतर आरोग्य विभाग (the health department) संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी युद्धस्तरावर तयारीला लागले आहे. दरम्यान नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून (the Nagpur Municipal Corporation's health department) मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ....

    नागपूर (Nagpur).  शहरात कोरोनाची दुसरी लाट (After the second wave of corona) संपल्यानंतर आरोग्य विभाग (the health department) संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी युद्धस्तरावर तयारीला लागले आहे. दरम्यान नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून (the Nagpur Municipal Corporation’s health department) मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार (Nagpur Corona Update) शहरात 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले. यामध्ये शहरातील 13, ग्रामीण भागातील 08 रुग्णांची नोंद करण्यात आली. जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या शून्य आहे.

    नागपूर जिल्ह्यात मंगळवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्य न झाल्याचे आढळून आले. आरोग्य विभागाकडून आज 6558 संशयित रुग्णांची कोरोना चाचणी करण्चात आली. यामध्ये शहरातील 4710 आणि ग्रामीण भागातील 1848 रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या 16 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शहरात एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 04 लाख 77 हजार आहे. सध्या शहरात कोरोना अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 0341 आहेत.