OBC समाजाला २७ टक्के आरक्षण देता आले नाही; डॉ. बबन तायवाडे यांचा मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बबनराव तायवाडे यांनी मोठी चळवळ उभारली आहे. राज्य शासनाला ओबीसी समाजाची आकडेवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करायची आहे.

  नागपूर (Nagpur) : राज्य मागासवर्ग आयोगाचे (State Backward Classes Commission) सदस्य डॉ. बबनराव तायवाडे (Dr Babanrao Taywade) यांनी त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी तो राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे पाठविला आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे (the National Federation of OBCs) ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नागपूरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.


   
  पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही (There is no moral right to remain in office)
  यावेळी तायवाडे म्हणाले की, “ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण देता येणार नसल्याने त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. म्हणून आपण राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे. मी राजकारणी नसल्यामुळे हृदयपरिवर्तन वगैरे होऊन राजीनामा परत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असेही तायवाडे म्हणाले.

  राजकीय आरक्षण देण्यासाठी डाटा आवश्यक (Data required for political reservation)
  तायवाडे यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे आयोगाच्या इम्पेरिकल डाटा गोळा करण्याच्या कामाला अद्याप प्रारंभसुद्धा झालेला नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी डॉ. बबनराव तायवाडे यांनी मोठी चळवळ उभारली आहे. राज्य शासनाला ओबीसी समाजाची आकडेवारी सर्वोच्च न्यायालयात सादर करायची आहे. त्याकरिता इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी राज्य सरकारने मागासवर्ग आयोगाची स्थापना केली आहे. महापालिकांच्या निवडणुकीत ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासाठी हा डाटा आवश्यक आहे.
   
  ओबीसींना २० टक्केच आरक्षण मिळणार (OBCs will get only 20 percent reservation)
  अनुसूचित जाती व जमातींना लोकसंख्येनुसार आरक्षण द्यायचे आहे. त्यांचे आरक्षण ३० टक्के होते. आरक्षणाची मर्यादा ५० टक्केच आहे. त्यामुळे ओबीसींना २० टक्केच आरक्षण मिळणार आहे. तेसुद्धा सर्व जिल्ह्यांमध्ये सारखे मिळणार नाही. आमची मागणी ओबीसींना २७ टक्के आरक्षणाची आहे. त्याकरिता केंद्र सरकार यांच्याशी लढा द्यावा लागणार आहे असे तायवाडे यानी यावेळी सांगितले.