yawatmal corona death

कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. गत दोन दिवसांमध्ये एकूण ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आतापर्यंत ३०७७ लोकांचे बळी गेले आहे.

नागपूर. कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. गत दोन दिवसांमध्ये एकूण ३१ रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आतापर्यंत ३०७७ लोकांचे बळी गेले आहे. यात शहरातील २१२१, ग्रामीण भागातील ५५६ आणि जिल्ह्याबाहेरील ४०० रुग्णांचा समावेश आहे. तसेच या दोन दिवसांमध्ये ४७९ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. याप्रमाणे आतापर्यंत जिल्ह्यात ९३,९०३ लोकं संक्रमित झाले आहे.

सोमवारी ५५६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली. याप्रमाणे आतापर्यंत ८५७६३ लोकं बरे होऊन घरी परतले आहे. सध्या जिल्ह्यात ५०६३ ॲक्टिव्ह केसेस आहे. शनिवारी शासकीय कार्यालय बंद असल्यामुळे आणि रविवार आल्यामुळे टेस्टिंगचा वेग मंदावला होता. या दोन दिवसांमध्ये ७०९० लोकांची तपासणी करण्यात आली.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, थंडीच्या दिवसांमध्ये कोरोनाची दुसऱ्यांदा लाट येऊ शकते. त्यामुळे आधीपासूनच वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. कोरोनाचे लक्षणे दिसताच लवकरात लवकर तपासणी करण्यात यावी. आतापर्यंत जिल्ह्यात ६०७३२७ लोकांची तपासणी करण्यात आली आहे.