कोरोनामुळे जन्माआधीच ५४५ बालकांचा बळी; गर्भवती महिलांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम

कोरोना (the corona) किती घातक आणि जीवघेणा आहे, याची तीव्रता संपूर्ण जगाने अनुभवली आहे. आता तर कोरोना रूपे बदलून मनुष्य जीविताला दिवसेंदिवस नवनवा धोका निर्माण करीत आहे. आबालवृद्धांच्या सुरक्षेची चिंता कायम ठेवणाऱ्या या विषाणूने.....

    नागपूर (Nagpur).  कोरोना (the corona) किती घातक आणि जीवघेणा आहे, याची तीव्रता संपूर्ण जगाने अनुभवली आहे. आता तर कोरोना रूपे बदलून मनुष्य जीविताला दिवसेंदिवस नवनवा धोका निर्माण करीत आहे. आबालवृद्धांच्या सुरक्षेची चिंता कायम ठेवणाऱ्या या विषाणूने (the virus) जन्माआधीच कोवळ्या जीवांचा (premature babies) बळी (killed) घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

    कोरोना विषाणूने गर्भवती महिलांच्या प्रकृतीवर गंभीर आघात केला असून त्यांना विषाणूच्या संसर्गामुळे नैसर्गिक गर्भपात करावा लागत आहे. नागपूर जिल्ह्यातील आकडेवारीने गर्भवती महिलांना विषाणूपासून असलेल्या धोक्याची प्रचिती आणून दिली आहे. कोरोनामुळे नैसर्गिक गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात मागील दीड वर्षांमध्ये नोंद झालेल्या एकूण गर्भपाताच्या प्रकरणांमध्ये 10 टक्के नैसर्गिक गर्भपाताच्या प्रकरणांना कोरोना विषाणूचा संसर्ग कारणीभूत ठरल्याचे उघडकीस आले आहे.

    कोरोनाच्या दोन्ही लाटांचा नागपुरवर भयंकर परिणाम
    नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही लाटांमध्ये भयावह स्थिती होती. याच काळात कोरोनामुळे नैसर्गिक गर्भपात आणि स्टील बर्थ म्हणजेच मृत बालकांच्या जन्माचे प्रमाणही वाढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गेल्या दीड वर्षात मेयो आणि मेडिकलमध्ये गर्भपाताच्या एकूण 545 प्रकरणांची नोंद झाली आहे. यातील सुमारे 15 टक्के प्रकरणे नैसर्गिक गर्भपाताची असून जवळपास 10 टक्के प्रकरणांमध्ये कोरोना कारणीभूत असल्याचे दिसून आले आहे.

    गर्भवती महिलांना सावधगिरीचा सल्ला
    नागपूर मेडीकलचे वैद्यकीय अधिक्षक डॅा. अविनाश गावंडे यांनी गर्भवती महिलांना असलेल्या कोरोनाच्या धोक्याबाबत सावध केले आहे. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोका आपल्या देशावरही ओढवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांनी विशेष सावधगिरी बाळगायला हवी, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून दिला जात आहे.