नागपुरात कोरोनामुळे ७६ जणांचा मृत्यू; नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे मृतांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. नागपुरात आज रविवारी कोरोनामुळे ७६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. यामध्ये शहरातील 48, ग्रामीण भागातील 16 आणि जिल्ह्याबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे.

    नागपूर (Nagpur).  कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे मृतांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. नागपुरात आज रविवारी कोरोनामुळे ७६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. यामध्ये शहरातील 48, ग्रामीण भागातील 16 आणि जिल्ह्याबाहेरील 12 रुग्णांचा समावेश आहे.

    मागील 24 तासात 6601 रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. एकूण कोरोना बाधितांची संख्या 4.24 लाखांवर पोहोचली आहे. सध्या 72 हजार 347 एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3.44 लाख नोंदविण्यात आली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या 7675 आहे.