ज्येष्ठांना दुसरी मात्रा घेण्यासाठी ८५ दिवसांची मुदत; प्रशासनाच्या धोरणांमुळे नागरिकांमध्ये नाराजी

कोरोना लसीकरणाला पहिल्या टप्प्यात नकार देणारे नागरिक (Citizens who refuse corona vaccination) कोरोना उद्रेकानंतर (corona outbreak) लसीकरणासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसऱ्या मात्रेसाठी (the second dose after taking the first dose) सरकार वारंवार अवधी वाढवत असल्याने ४५ वर्षांवरील सर्वच वयोगटात संताप व्यक्त केला जात आहे. एकवेळ खायला मिळाले नाही तरी चालेल पण लस मिळालीच पाहिजे, अशा प्रतिक्रिया आता नागरिक व्यक्त करीत आहेत.

  नागपूर (Nagpur).  कोरोना लसीकरणाला पहिल्या टप्प्यात नकार देणारे नागरिक (Citizens who refuse corona vaccination) कोरोना उद्रेकानंतर (corona outbreak) लसीकरणासाठी वणवण भटकताना दिसत आहेत. पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसऱ्या मात्रेसाठी (the second dose after taking the first dose) सरकार वारंवार अवधी वाढवत असल्याने ४५ वर्षांवरील सर्वच वयोगटात संताप व्यक्त केला जात आहे. एकवेळ खायला मिळाले नाही तरी चालेल पण लस मिळालीच पाहिजे, अशा प्रतिक्रिया आता नागरिक व्यक्त करीत आहेत. दुसरी मात्रा घेणाऱ्यांची गर्दी बघता आता ८५ दिवसांचा कालावधी निर्धारित करण्यात आला आहे. (Considering the crowd of those taking the second dose)

  कोरोना आपल्याला होतच नाही, करोनाची लस घेणारच नाही, असे म्हणणाऱ्यांना करोना विषाणूने त्याची वास्तविकता लक्षात आणून दिली. दुसऱ्या लाटेत करोनामुळे मरणाऱ्यांची संख्या बघता आणि उपचारासाठी होणारे हाल लक्षात घेता सर्वच वयोगटातील नागरिक आता लस घेण्यासाठी धडपडत आहेत. पहिल्या टप्प्यात लसीकरण के ंद्रावर कोणी जात नव्हते आता तेथील गर्दी कमी होताना दिसत नाही, असे चित्र आहे. अशातच लस तुटवडय़ामुळे संतापात भर पडत आहे.

  दुसऱ्या मात्रेसाठी देण्यात आलेल्या मुदतीत वारंवार वाढ के ली जात असल्याने लसीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. कोविशिल्डच्या दुसऱ्या मात्रेचा अवधी प्रथम २८ दिवसांचा होता. नंतर तो ४५ दिवसांचा करण्यात आला आणि आता ८५ दिवसांनी लस दिली जाईल असे सांगण्यात येते. ज्यांनी दुसरी मात्रा घेतली नाही त्यांना करोना भयाने ग्रासले आहे. दुसरी मात्रा घेण्यास उशीर झाला आणि यादरम्यान करोना झाला तर जबाबदार कोण, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. सर्वाधिक संताप हा ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे. मुदतवाढीबाबत ज्येष्ठ नागरिकांना माहिती नसल्यामुळे ते कधी केंद्र सरकारवर तर कधी राज्य सरकारवर राग व्यक्त करतात. महापालिकेला नावबोट ठेवले जाते. विशेषत: ज्या ज्येष्ठ नागरिकांनी १ ते ५ एप्रिल या दरम्यान कोविशिल्ड लस घेतली असे नागरिक विविध लसीकरण केंद्रांवर दिसून येत आहेत.

  मात्र त्यांना पुढील महिन्यात १२ किंवा १५ जूननंतर या असे संगितले जात आहे. कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांना मात्र वेळातच दुसरी मात्रा दिली जात आहे. दिघोरी, पारडी आणि नंदनवन भाागातील अनेक लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक व केंद्रावरील कर्मचाऱ्यांचे दररोज यावरून वाद होत असल्याचे दिसून येत आहे. पांडे लेआऊट, लोधीपुरातील सरस्वती विद्यालयातील केंद्र, गंजीपेठ, दटके आरोग्य केंद्र, विवेकानंद नगरमधील लसीकरण केंद्रावर दुसरी मात्र घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. मात्र अनेकांनाा लस न घेता माघारी परतावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

  लसिकरणासाठी वारंवार चकरा मारायला लावतात
  लसीची पहिली मात्रा ६ एप्रिलला घेतली. दिघोरीतील लसीकरण केंद्रावर दुसरी मात्रा घेण्यासाठी आलो. मात्र आता ८५ दिवसानंतर या असे सांगितले. हा काय खेळखोळंबा लावला आहे? दोन दिवसापूर्वी आलो तर लस संपली होती आणि आता काय ८५ दिवसानंतर या. आम्ही लस घेण्यासाठी किती फे ऱ्या मारायच्या ?
  – रवींद्र गोजे, ज्येष्ठ नागरिक, दुर्गा नगर

  तर सर्वांनीच कोव्हॅक्सिन घेतली असती
  कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांना ठरलेल्या मुदतीत दुसरी मात्रा दिली जाते. कोविशिल्ड घेणाऱ्यांना दुसरी मात्रा वेळेत का दिली जात नाही. प्रथम लोकांना याबाबत माहिती दिली असती तर सर्वानीच कोव्हॅक्सिन घेतली असती. एक लस घेतल्यावर दुसऱ्या मात्रेसाठी वणवण भटकण्याची वेळ सकराने ज्येष्ठ नागरिकांवर आणली हे वाईट आहे. ८५ दिवसांनी दुसरी मात्रा घ्यायची. पण पहिल्या मात्रेचा प्रभाव दीर्घकाळ राहतो का, याबाबत कोणीच काही सांगत नाही.
  – लता महाकाळकर, ज्येष्ठ नागरिक, महाल.