इतिहासातील एक रक्ताळलेले पान : ”जालियनवाला बाग” नाटकाचा प्रयोग नागपुरात; भारतीयांच्या बलिदानाचा अग्निकुंड धगधगणार

जमलेल्या जनतेच्या उत्साहावर जनरल ओडवायर यांच्या सांगण्यावरून जनरल डायरने कोणतीही पूर्व सूचना न देता बेछूट गोळीबार केला होता. यात 1400 हून अधिक लोक मारली गेली, सहा हजारहून अधिक लोक जखमी झाले होते. प्रत्यक्ष मृत्यूदूतानाही शरम वाटावी असे अमानुष मृत्युतांडव जनरल डायर आणि ओडवायर यांनी खेळले होते.

    नागपूर (Nagpur) : स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सव वर्ष आणि गांधी जयंती निमित्याने दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र प्रस्तुत आणि संजय भाकरे फाउंडेशन निर्मित “जालियनवाला बाग” हे नाटक दिनांक 3 आक्टोबरला दुपारी 2 वाजता दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या फेसबुक पेज सह इतर समाज मध्यमावरून याचे प्रसारण केले जाणार आहे. रसिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

    इतिहासात रक्ताळलेले पान म्हणून ज्या घटनेची नोंद झाली ती घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. कारण काही घटना विसरण्यासाठी नसतात किंवा विसरूही शकत नाही अशीच ही घटना प्रत्येक भारतीयांच्या मनात भळभळणार्‍या जखमेसारखी अमृतसर शहरातील जालियनवाला बागेत घडली. बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी जमलेल्या शहरातील सामान्य जनता या बागेत जमली होती.

    या जमलेल्या जनतेच्या उत्साहावर जनरल ओडवायर यांच्या सांगण्यावरून जनरल डायरने कोणतीही पूर्व सूचना न देता बेछूट गोळीबार केला होता. यात 1400 हून अधिक लोक मारली गेली, सहा हजारहून अधिक लोक जखमी झाले होते. प्रत्यक्ष मृत्यूदूतानाही शरम वाटावी असे अमानुष मृत्युतांडव जनरल डायर आणि ओडवायर यांनी खेळले होते. यात सुदैवाने वाचलेले सरदार उधमसिंग यांनी या घटनेचा प्रतिशोध घेण्याची प्रतिज्ञा घेतली. तब्बल एकवीस वर्ष शोध घेत राहिले. अखेरीस लंडनला सर्वांसमक्ष त्याला गोळी घालून शपथ पूर्ण केली. या वीर कृत्यासाठी सरदार उधमसिंग निडरतेने फासावर गेले.

    संजय भाकरे फाउंडेशनच्या नवोदित कलाकारांनी या नाटकात सहभाग घेतला. सचिन गिरी, आदित्य घुळघुळे, संकल्प पायल, मधुरा शिलेदार, ध्रुवी शाह, सागर देशपांडे, यांनी भूमिका केल्यात. नाटकाचे लेखक अमेय जाधव असून दिग्दर्शन संजय भाकरे यांनी केले. प्रकाश योजना ऋषभ धपोडकर, संगीत अभिषेक बेल्लारवार, कपडेपट जुई गडकरी, नेपथ्य नितीश गाडगे, दिव्या विंचुरकर, सुमीत बावणे, अनीता भाकरे, सुयश गाडगे यांनी निर्मिती सहाय केले.