nagpur

अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला नाल्यात फेकले. रविवारी रात्री वाठोडा परिसरात मिळालेल्या नवजात बाळाच्या मृतदेहाने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी बाळाच्या अज्ञात माते विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

नागपूर. अनैतिक संबंधातून गर्भवती झालेल्या महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर त्याला नाल्यात फेकले. रविवारी रात्री वाठोडा परिसरात मिळालेल्या नवजात बाळाच्या मृतदेहाने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी बाळाच्या अज्ञात माते विरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

जबलपूर-हैद्राबाद रिंग रोडवर पुलाखाली स्थानिक नागरिकांना कपड्यामध्ये काहीतरी गुंडाळून असलेले दिसले. संशय आल्याने नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. वाठोडा पोलिस घटनास्थळावर पोहोचले. तपासले असता कपड्यात नवजात बाळाचा मृतदेह दिसला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात रवाना करण्यात आला. पोलिसांचा अंदाज आहे की, अज्ञात महिलेने अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची लपवणूक करण्याच्या हेतूने त्याला कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले. घटनास्थळावर बघ्यांची चांगलीच गर्दी जमली होती. एका वृद्धाने सांगितले की, १ महिला आणि पुरुषाला त्यांनी कारमध्ये पाहिले होते. दोघेही कारमधून उतरले आणि नाल्यात काही फेकून पसार झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज पाहून प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.