२२ किलो वजनाचा दुर्मिळ कासव रस्त्यावर आढळला; वन्यप्रेमींसाठी ठरला कुतुहलाचा विषय

नागपूर (Nagpur) शहरातील मानवी वस्त्यांमध्ये (wildlife infestation in human settlements) वन्यप्राण्यांचा संचार करण्याच्या अनेक घटना आपण वाचतो आहोत. दरम्यान नागपुरातील हिंगणा भागातील (Hingana area) वस्तीमध्ये मंगळवारी रात्री 22 किलो वजनाचा दुर्मिळ प्रजातीचा कासव (tortoise) आढळून आला.

    नागपूर (Nagpur). शहरातील मानवी वस्त्यांमध्ये (wildlife infestation in human settlements) वन्यप्राण्यांचा संचार करण्याच्या अनेक घटना आपण वाचतो आहोत. दरम्यान नागपुरातील हिंगणा भागातील (Hingana area) वस्तीमध्ये मंगळवारी रात्री 22 किलो वजनाचा दुर्मिळ प्रजातीचा कासव (tortoise) आढळून आला. स्थानिक रहिवासी गजानन ढाकुळकर यांनी कासवाची माहिती हिंगणा वनपरिक्षेत्र अधिकारी (Hingana Forest Range Officer) आशीष निनावे यांना दिली. (Tortoise found in Hingna area of Nagpur)

    निनावे यांनी वन्यकर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले आणि कासवाला ताब्यात घेतले. सेमिनेरी हिल्स येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रात कासवाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

    केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद बिलाल अली, डॉ. मयूर काटे, पशुपर्यवेशक सित्रांत मोरे यांनी राज्य वन्यजीव मंडळ सदस्य कुंदन हाते यांच्या मार्गदर्शनात कासवाची तपासणी के ली. यावेळी ट्रान्झिटचे वनपरिक्षेत्र अधिकारी गंगाधर जाधव देखील उपस्थित होते. हा कासव जलचर असून त्याचे नाव ‘लेथ्स सॉफ्टशेल टर्टल’ असे आहे. हा कासव दुर्मिळ असून प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळणारा आहे. कासवाचे वजन २२ किलो २०० ग्रॅम असून लांबी ८३ सेंटिमीटर व रुंदी ५१ सेंटिमीटर आहे.

    शरीराचा घेर १६५ सेंटिमीटर आहे. कासवाचे आरोग्य उत्तम असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल, असे केंद्रातर्फे सांगण्यात आले.