अर्ध्या महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा! ऑगस्ट संपण्याच्या वाटेवर; शेतकरी चिंताग्रस्त

राज्यावर कोरड्या ढगांचं वादळ घोंगावतंय. हातातोंडाशी आलेला घास निसटून जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झालीय. ऑगस्ट महिना संपत आलाय. तरी राज्यातील बहुतांश जिल्हे अजूनही कोरडेठाकच आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळला तर सर्वच जिल्ह्यांमध्ये खंड पडल्यानं पावसाची टक्केवारी उणे झालीय.

    नागपूर (Nagpur) : राज्यात पावसाचा कहर (rains in the state) होणार अशा फसव्या घोषणा (False announcements) हवामाना विभागाकडून (the Meteorological Department) करण्यात आल्या होत्या; पण यंदा स्थिती गंभीर आहे. ऐन पावसाळ्यातच पावसाने पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली. खान्देश, विदर्भ, मराठवाडा, झाडीपट्टीचा भाग (Khandesh, Vidarbha, Marathwada, Zadipatti) आणि अन्य प्रदेशातही पावसाचे प्रमाण (Rainfall) निम्म्यापेक्षाही कमी आहे. यामुळे आगामी काळात पडणाऱ्या भीषण दुष्काळाची चाहूल (A severe drought) आतापासूनच लागायला सुरुवात झाली आहे.

    दरवर्षी ७ जूनला येणारा पाऊस यंदा जरा लवकरच आला. पावसाच्या आगमनानं भेगाळलेली भुई थंडगार झाली आणि बळीराजा मनोमन सुखावला. पण त्याच्या या सुखावर कोरड्या ढगांचं वादळ घोंगावतंय. हातातोंडाशी आलेला घास निसटून जाईल की काय, अशी स्थिती निर्माण झालीय. ऑगस्ट महिना संपत आलाय. तरी राज्यातील बहुतांश जिल्हे अजूनही कोरडेठाकच आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग वगळला तर सर्वच जिल्ह्यांमध्ये खंड पडल्यानं पावसाची टक्केवारी उणे झालीय. हिरवीगार दिसणारी शेती आता करपू लागलीय. शिवाय रोग पडण्याचा धोकाही आहे.

    राज्यातलं पावसाचं प्रमाण
    यंदाच्या वर्षात राज्यातल्या एकाही जिल्ह्यात 60 % हून अधिक पाऊस झालेला नाही. तर केवळ 9 जिल्ह्यात 20 ते 59% पाऊस झाला आहे. लातूर, हिंगेली, नंदूरबार, धुळे,जळगाव, बुलडाणा, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाची टक्केवारी उणे आहे. तर पुणे, सांगली, अहमदनगर, सोलापूर, नांदेड, वाशिम, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये 20 टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

    नापिकी, कर्जबाजारीपणा, बाजारभाव अशा दुष्टचक्रात आधीच शेतकरी पुरता नाडला गेलाय. त्यात आता कोरड्या दुष्काळाचं संकट. बळीराजाचे डोळे पुन्हा एकदा आभाळाकडे लागलेत. ढग कोरडे झालेत, त्याच्या डोळ्यात मात्र आसवांचा पूर दाटलाय.