अवैध सावकारी प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक – गुहमंत्री अनिल देशमुख

नागपूर - भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर शिवारात अवैद्य सावकारी प्रकरणात महिलेला मारहाण करून शेती बळजबरीने बळकावण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात भिवापूर पोलीस स्टेशनला विनयभंग, फसवणूक व

 नागपूर – भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर शिवारात अवैद्य सावकारी प्रकरणात महिलेला मारहाण करून शेती बळजबरीने बळकावण्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात भिवापूर पोलीस स्टेशनला विनयभंग, फसवणूक व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत  गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

 भिवापुर तालुक्यातील वाकेश्वर शिवारात पीडित महिलेच्या पतीची जमीन आहे. आरोपी अभय पाटील कडून पीडित महिलेच्या पतीने दोन लाख रुपये उसनवारीने घेतले होते. 

 याच प्रकारातून २० जूनला पीडित महिला ही शेतात काम करीत असताना आरोपी अभय पाटील व त्याची पत्नी प्राजक्ता पाटील हे गेले. त्यांनी पीडित महिलेला मारहाण करून शेता बाहेर काढले. हा प्रकार समोर येताच भिवापूर पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून कलम ३५४, ३५४(४),३५४ (ब),४२०, ३२३,५०४,५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत कलम ३९,४१(क) , ४५ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.