प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

गांजा तस्करांची धरपकड करण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना मोठं यश आलं आहे. चंद्रपूर नागपूर रोडवर सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. जवळपास सात लाख रुपये किमतीचा सुमारे 70 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

    नागपूर (Nagpur).  गांजा तस्करांची धरपकड करण्यात नागपूर ग्रामीण पोलिसांना (Nagpur Rural Police) मोठं यश आलं आहे. चंद्रपूर नागपूर रोडवर सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली. जवळपास सात लाख रुपये किमतीचा सुमारे 70 किलो गांजा (cannabis) पोलिसांनी जप्त केला आहे. (Nagpur Police detained Cannabis from a car)

    नागपूर ग्रामीण पोलिसांनी चंद्रपूर नागपूर रोडवर सापळा रचून गांजा तस्करी करणाऱ्यांना पकडलं. एका कारमधून उत्तर प्रदेशमधील आरोपी गांजा तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे. कारच्या सीटखाली आणि डिक्कीच्या खालच्या भागात गांजा लपवून ठेवण्यात आला होता.

    35 पॅकेटमध्ये 69 किलो 500 ग्राम गांजा सापडला आहे. जवळपास 6 लाख 95 हजार रुपये किमतीच्या गांजाची तस्करी केली जात होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.