१ जानेवारीपासून धावणार अतिरिक्त गाड्य; रेल्वे विभाग लागले कामाला

बसेसशिवाय अधिकाधिक लोकं आपल्या खासगी वाहनांचा वापर दररोजच्या परिवहनासाठी करीत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे आपल्या नियमित प्रवाशांना गमावू इच्छीत नाही. यामुळे लवकरात लवकर अधिकाधिक गाड्या सुरू करण्याचा दबाव आहे.

नागपूर. कोरोना संक्रमणामुळे प्रत्येक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यापासून भारतीय रेल्वेही सुटली नाही. लॉकडाउनमुळे ऐतिहासिक बंदचा फटका बसलेल्या रेल्वेतर्फे आजही मोठ्या अवघड परिस्थितीत ८०० ट्रेन चालविण्यात येत आहे. सुत्रानुसार रेल्वेने १ जानेवारीपासून मोठ्या प्रमाणात गाड्या सुरू करण्याची तयारी चालविली आहे(Additional trains to run from January 1). अधिकाऱ्यांनुसार सुमारे ७० टक्के गाड्या पुन्हा पटरीवर धावतील. लॉकडाउनमध्ये बंद केलेल्या जवळपास १२००० गाड्यांपैकी सुमारे ८००० पेक्षा अधिक प्रवासी
ट्रेन्स पटरी धावू लागतील.

नागपूर स्टेशनवरुन पूर्वी दररोज २०० पेक्षा अधिक प्रवाशी गाड्या धावत होत्या आणि ३०००० पेक्षा अधिक प्रवाशांचे आवागमन होत होते. आता ते कमी होऊन केवळ ३००० ते ५००० प्रवाशांपर्यंत मर्यादित झाली आहे. तसेच गत आठ महिन्यांमध्ये रेल्वेचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुसरीकडे रस्ता वाहतूक चांगली झाल्यामुळे रेल्वेला माल वाहतुकीत मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. गाड्यांच्या मर्यादित संख्येमुळे प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. दुसरीकडे मर्यादित गाउ्या असल्यामुळे आता लोक रस्ता परिवहनाकडे वळत आहे. ते आधी दररोज रेल्वेने प्रवास करीत होते.

बसेसशिवाय अधिकाधिक लोकं आपल्या खासगी वाहनांचा वापर दररोजच्या परिवहनासाठी करीत आहे. अशा परिस्थितीत रेल्वे आपल्या नियमित प्रवाशांना गमावू इच्छीत नाही. यामुळे लवकरात लवकर अधिकाधिक गाड्या सुरू करण्याचा दबाव आहे.