धनगर आरक्षणावरून आक्रमक भाजप खासदारांचा आंदोलनाचा इशारा

माध्यमांशी बोलताना खा. महात्मे यानी धनगर आरक्षणासाठी तर या सरकारने काहीच केले नाही, असा आरोप केला आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केले होते.

    नागपूर: ओबीसी आरक्षणावरून भाजपमधील ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणावरूनही भाजपच्या मराठा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता धनगर आरक्षणावरून भाजपचे खासदार विकास महात्मे यांनी दंड थोपटले आहेत. राज्य सरकारने धनगर समाजाला प्राधान्याने आरक्षण द्यावे, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विकास महात्मे यांनी दिला आहे.

    माध्यमांशी बोलताना खा. महात्मे यानी धनगर आरक्षणासाठी तर या सरकारने काहीच केले नाही, असा आरोप केला आहे. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटी रुपये मंजूर केले होते.

    महाविकास आघाडी सरकारने ही रक्कम धनगर समाजाला द्यावी, अशी मागणी करतानाच धनगर समाजाला आरक्षण दिले नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.