अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील देशपांडे यांचे कोरोनामुळे निधन

M.S.W केल्यानंतर, आर्किटेक्ट विनू काळे यांच्या प्रेरणेने त्यांनी बांबू हे आपले कार्यक्षेत्र ठरवले होते. अखिल भारतीय कारागीर पंचायतचे ते राष्ट्रीय संघटक होते. सुरुवातीस त्यांनी नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट प्रकल्पात ही कार्य केले होते.

  नागपूर : संपूर्ण बांबू केंद्र लवादा मेळघाटचे संस्थापक वेणूपुत्र सुनील गुणवंतराव देशपांडे यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले. नागपूर येथील किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

  M.S.W केल्यानंतर, आर्किटेक्ट विनू काळे यांच्या प्रेरणेने त्यांनी बांबू हे आपले कार्यक्षेत्र ठरवले होते. अखिल भारतीय कारागीर पंचायतचे ते राष्ट्रीय संघटक होते. सुरुवातीस त्यांनी नानाजी देशमुख यांच्या चित्रकूट प्रकल्पात ही कार्य केले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी डॉ. निरुपमा, कन्या मुग्धा व मोठा कार्यकर्ता परिवार आहे.

  सुनीलजी देशपांडे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद: देवेंद्र फडणवीस

  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनीलजी देशपांडे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. संपूर्ण बांबू प्रकल्प, सिपना शोध यात्रा, ग्राम ज्ञानपीठ अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून त्यांनी आपले संपूर्ण जीवन आदिवासी विकासासाठी समर्पित केले होते.

  मेळघाटमधील त्यांचे प्रकल्प हे ग्राम आणि आदिवासी विकासाचे पथदर्शी प्रकल्प! आदिवासींना शिक्षित करून त्यातून नेतृत्व निर्मितीसाठी त्यांची सदा तळमळ असायची. त्यांचे आपल्यातून निघून जाणे ही फार मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शान्ति

  Akhil Bharatiya Vidyarthi Parishad senior activist Sunil Deshpande dies due to corona