‘विठाई’च्या अभिवाचनाने अक्षर दिंडीला सुरुवात; नवोदित कलाकारांकडून विठाईच्या गीतांचे सादरीकरण

भक्त तालावर डोलू लागतात; पण सद्य परिस्थितीमुळे अनेक गोष्टींवर बंधने (restrictions) लावण्यात आली आहेत. त्यामुळे बरेच कार्यक्रम (events) ऑनलाईन (online) पद्धतीने घेण्यात येत आहेत. संजय भाकरे फाउंडेशनच्या (Sanjay Bhakre Foundation) नवोदित कलाकारांनी 'विठाई' (Vithai) या कथेचे अभिवाचन करून...

    नागपूर (Nagpur). आषाढीची वारी (the Ashadi Wari) सुरू झाली की, विठ्ठलाच्या भजनात (the hymns of Vitthal) प्रत्येक जण रमत असतो. टाळ मृदूंगासह संतांची भक्तिगीते (The devotional songs of the saints) निनादू लागतात. भक्त तालावर डोलू लागतात; पण सद्य परिस्थितीमुळे अनेक गोष्टींवर बंधने (restrictions) लावण्यात आली आहेत. त्यामुळे बरेच कार्यक्रम (events) ऑनलाईन (online) पद्धतीने घेण्यात येत आहेत. संजय भाकरे फाउंडेशनच्या (Sanjay Bhakre Foundation) नवोदित कलाकारांनी ‘विठाई’ (Vithai) या कथेचे अभिवाचन करून एक अभिनव प्रस्तुती दिली.

    विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथालय विभागात हा अभिवाचनाचा सादर करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ‘माझी अक्षर दिंडी’ या कार्यक्रमाने करण्यात आली. यात वर्षा देशपांडे, स्मिता खंगई, स्वाती मोहरीर, विवेक अलोणी आणि प्रकाश एदलाबादकर यांनी केलेल्या कार्याची अक्षर दिंडी रसिकांसमोर सादर केली.

    यानंतर नवोदितांसाठी सक्रिय कार्य करणारी आणि नाट्य चळवळीत संधी देऊन अनेक कलावंतांना प्रोत्साहित करणारी संजय भाकरे फाऊंडेशनने योगीराज बागुल लिखित ‘विठाबाईंचा तमाशा’ या कादंबरीवर आधारित ‘विठाई’ या लघु कथेच्या अभिवाचनाला सुरुवात झाली. शब्दांची उत्तम रचना, विठाबाईचा जीवनपट, त्यातील गाणी, गवळणी आणि कृष्णाच्या रास क्रीडा याच बरोबर ताल आणि घुंगरू यांचा उत्तम वापर या अभिवाचनातून करण्यात आला. या अभिवाचनात प्रथमच रंगमंचावर पदार्पण करणाऱ्या दिव्या विंचूरकर, मधुरा शिलेदार आणि जुई गडकरी यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. वाचनातली अभिव्यक्ती साकार करण्याची कला या निमित्ताने रसिकांना मोहून गेली.

    या अभिवाचनाचे दिग्दर्शन संजय भाकरे यांनी केले असून निर्मिती अनिता भाकरे यांची होती. शेखर मंगलमूर्ती यांनी सहाय्य केले. तंत्र सहय्य नितीश गाडगे यांनी केले. कार्यक्रमाला दिलीप म्हैसाळकर, फाउंडेशनचे कलावंत आणि रसिकांची उपस्थितही होती. बरेच दिवसानंतर रसिकांना एक उत्तम कार्यक्रम अनुभवला. आभासी माध्यमावरील या अभिवाचनाने श्रोते भारावून गेले होते.