‘माफसू’मध्ये भरतीप्रक्रियेत मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती केल्याचा आरोप; राज्यपालांकडे तक्रार

करिअर अ‍ॅडव्हॉन्स स्कीम अंतर्गत प्राध्यापक पद प्राप्त उमेदवारांना सेवाज्येष्ठता देऊन पात्र ठरवण्यात आले. हे करताना विद्यापीठ अधिनियम व परिनियमातील तरतुदींचा भंग करण्यात आला. मुलाखतीच्या प्रक्रियेमध्येही जवळच्या लोकांची तज्ज्ञ सदस्य पदांची नेमणूक करून मुलाखतीचा फार्स केल्याचा आरोप ........

  नागपूर (Nagpur) : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठामध्ये (माफसू) (the Maharashtra University of Animal and Fisheries Sciences) (MAFSU)) अलीकडेच घेण्यात आलेल्या वरिष्ठ अधिकारी पदाच्या भरतीप्रक्रियेमध्ये (the recruitment process) गैरप्रकार (irregularities) झाला आहे. छाननी समितीमध्ये मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती केल्याची तक्रार विद्यापीठाचे कुलपती (Governor of the University) व राज्यपाल भरतसिंग कोश्यारी (Governor Bharatsingh Koshyari) यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशीष पातुरकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

  ‘माफसू’मध्ये अनेक वर्षांपासून भरती प्रक्रिया रखडल्यामुळे अधिष्ठाता व संचालक अशा पदांची जबाबदारी प्रभारींच्या भरवशावर होती. त्यामुळे कुलगुरू डॉ. पातुरकर यांनी पुढाकार घेत या पदांवर नियमित अधिकाऱ्यांची नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली. ही संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या अधीन राहून करण्यात आली. मात्र, हे करताना संपूर्ण प्रक्रियेमध्ये मर्जीतील व्यक्तींची निवड व अपात्र उमेदवारांना नेमण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी राज्यपालकांकडे केलेल्या तक्रारीनुसार, माफसूमध्ये एका वर्षांपूर्वी विद्यापीठातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदे भरण्याकरिता जाहिरात देऊन अर्ज मागवले; मात्र अर्ज छाननी समितीमध्ये मर्जीतील अपात्र उमेदवारांची निवड करण्यात आल्याचा आरोप आहे.

  करिअर अ‍ॅडव्हॉन्स स्कीम अंतर्गत प्राध्यापक पद प्राप्त उमेदवारांना सेवाज्येष्ठता देऊन पात्र ठरवण्यात आले. हे करताना विद्यापीठ अधिनियम व परिनियमातील तरतुदींचा भंग करण्यात आला. मुलाखतीच्या प्रक्रियेमध्येही जवळच्या लोकांची तज्ज्ञ सदस्य पदांची नेमणूक करून मुलाखतीचा फार्स केल्याचा आरोप करीत ही भरतीप्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी राजेंद्र वैद्य यांनी केली आहे.

  आरोप काय?
  डॉ. शिरीष उपाध्ये, डॉ. नितीन कुरकुरे, डॉ. माधव पाटील या अपात्र प्राध्यापकांना मुलाखतीस नियमबा पद्धतीने पात्र ठरवल्याचा आरोप आहे. यापैकी एका उमेदवाराने कधीही सहायोगी प्राध्यापक पदाचे काम केले नसतानाही त्यांना बेकायदेशीरपणे पात्र ठरवले तर एका उमेदवाराविरोधात गिट्टीखदान पोलिसात २००८च्या भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला आहे. असे असतानाही त्यांना निवडल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

  ‘कुठलाही गैरप्रकार नाही’– कुलगुरू
  ही भरती प्रक्रिया ही पूर्णपणे कायद्यानुसार झाली आहे. निवड समितीमध्ये सहा कुलगुरूंचा समावेश होता. त्यामुळे यात कुठलाही गैरप्रकार होण्याचा प्रश्नच येत नाही. कायद्याने भरती प्रक्रियेवरही बंधन आहेत. त्यामुळे चुकीची कुठलीही पद्धत वापरताच येत नाही. तरीही ही तक्रार व्यवस्थापन परिषदेसमोर मांडण्यात येणार असून तेथे सत्य समोर येईल. यावरही तक्रारकर्त्यांचे समाधान होत नसेल तर त्यांनी प्रत्यक्ष भेट घ्यावी. आम्ही त्यांना प्रत्येक प्रक्रियेची सविस्तर माहिती देऊ.
  – डॉ. आशीष पातुरकर, कुलगुरू, माफसू.