corona update in nagpur

नागपूर. सध्याचा काळ हा कोविड संसर्गाचा धोकादायक काळ आहे. त्यामुळे आपल्या घरातील सदस्य आपले स्नेही, आप्त यांच्याबद्दद आपल्या मनात जिव्हाळा असेल तर तो त्यांच्यापासून दूर राहूनच व्यक्‍त करा. सध्या एकमेकांपासून दूर राहून दुसऱ्यांवरील धोका कमी करता येऊ शकतो, त्यामुळे प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखा व घरीच राहा, असे आवाहन अमेय हॉस्पिटलचे amey hospital) डॉ. रवींद्र सरनाईक (Dr. Ravindra Sarnaik) यांनी केले. महापौर संदीप जोशी (Sandip Joshi) यांच्या संकल्पनेतून महानगरपालिका (NMC) आणि इंडियन मेडिकळ असोशिएनशच्या (Indian medical association) संयुक्‍त विद्यमाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या कोविड रुग्णांसाठी ‘कोविड संवाद’ या शीर्षकांतर्गत ‘फेसबुक लाईव्ह’च्या (facebook live) माध्यमातून संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

गुरूवारी प्रमुख मार्गदर्शक अमेय हॉस्पीटळचे डॉ. रवींद्र सरनाईक आणि इंडियन मेडिकळ असोसिएनशच्या अध्यक्ष व कोठारी हॉस्पिटलच्या संचाळक डॉ. अर्चना कोठारी उपस्थित होत्या. याप्रसंगी मनपाचे आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे यांनी सुरुवातीळ ‘कोविड संवाद’मागीळ संकल्पना विषद केली. डॉ. अर्चना कोठारी यांनी होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना नेहमीच पडत असलेले प्रश्‍न विचारले. या प्रश्‍नांना डॉ. रवींद्र सरनाईक यांनी समर्पक उत्तरे दिलीत.

कोरोनाला स्वतःपासून दूर ठेवायचे असेळ तर ‘एसएमएस’ या त्रिसूत्रीच अंगीकार करा. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर या तीन गोष्टींना जबळ करा आणि कोरोनाला दूर ठेवा, असा सल्लाही त्यांनी दिला. पॉझिटिव्ह आल्यास ‘आयसोलेशन’च्या नियमांचे पुरेपूर पाळन करा. १० दिवस आयसोलेशन आणि त्यापुढील ७ दिवस क्वारंटाईन या शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करा. या काळात स्वतःच स्वतःची काळजी घ्या. आहारावर लक्ष द्या आणि विशेष म्हणजे घरातील कोणत्याही व्यक्तींच्या संपर्कात येणार नाही हे कटाक्षाने पाळा, असे आवाहन त्यांनी केले. शुक्रवारी किंग्सवे हॉस्पीटळचे डॉ. प्रमोद गांधी या कार्यक्रमात भाग घेतील.