अनिल देशमुख अंडरग्राऊंड? ; दिल्ली दौऱ्यानंतर देखमुख कुठे आहेत कोणाला माहिती नाही

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या. अखेर या प्रकरणात अनिल देशमुख यांना आपल्या गृहमंत्रिपदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला.

    नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील काटोल आणि वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापा टाकला. रविवारी सकाळपासूनच अंमलबजावणी संचलनालयाने छापेमारी सुरु केली होती. चार तासाच्या चौकशी मध्ये ईडीच्या पथकाने जुन्या कागदपत्राची पाहणी केली सोबत अनिल देशमुख यांच्या कुटूंबियांची इतर संपत्तीची नोकरांकडून विचारपूस केली. दरम्यान अनिल देशमुख कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही.अनिल देशमुख यांच्यासोबत फोनवरही संपर्क होऊ शकला नाही आहे. रविवारी छापेमारी दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी नागपूर आणि आजूबाजूच्या अनेक ठिकाणी अनिल देशमुखांचा शोध घेण्यााचा प्रयत्न केला. पण त्यांचा ठावठिकाणा कुठे लागला नाही. त्यामुळे अनिल देशमुख लपून बसले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    अनिल देशमुख यांना ईडीने समन्स दिल्यापासून ते ईडी कार्यालयात पोहचले नाही. दिल्लीच्या दौऱ्यानंतर मागच्या १५ दिवसांपासून अनिल देखमुख कुठे आहे याबद्दल कोणाला माहिती नाही.दोन दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केलीय. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत ४.२० कोटी रुपये इतकी आहे.