अनिल देशमुख यांच्या घरावर ईडी, सीबीआयनंतर आता आयकर विभागाचा छापा

मनी लॉण्ड्रिंगचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे. यापूर्वी ईडी व सीबीआयनं अनेकदा देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी छापे टाकले होते. देशमुख यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र, अद्याप ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत.

    नागपूर (Nagpur): राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (the NCP leader) व राज्याचे माजी गृहमंत्री (former state home minister) यांच्या मागील चौकशीचा ससेमिरा सुरूच आहे. आयकर विभागानं (The Income Tax Department) आज पुन्हा एकदा अनिल देशमुख यांच्या घरांवर (Raid On Anil Deshmukh’s house) छापे टाकले आहेत. मुंबई व नागपूर येथील घरी आयकर विभागाचे (Income tax officials) अधिकारी झाडाझडती घेत आहेत.

    अँटिलिया स्फोटकं प्रकरणानंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्या होत्या. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनाही या प्रकरणात जावे लागले. त्यामुळं संतापलेल्या सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. सचिन वाझे व अन्य काही पोलीस अधिकाऱ्यांना देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंह यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या गदारोळामुळं देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र, राजीनामा दिल्यानंतरही ईडी, आयकर विभाग व सीबीआय चौकशीचा ससेमिरा सुरू आहे.

    मनी लॉण्ड्रिंगचा आरोपही देशमुख यांच्यावर आहे. यापूर्वी ईडी व सीबीआयनं अनेकदा देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी छापे टाकले होते. देशमुख यांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात आलं होतं. मात्र, अद्याप ते चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. असं असलं तरी देशमुख यांच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचं तपास यंत्रणांचं काम सुरूच आहे. याचाच भाग म्हणून आज सकाळी ११.३० वाजता दरम्यान देशमुखांचे नागपूर व काटोल येथील निवासस्थान, एनआयटी कॉलेज तसंच, मुंबईतील ज्ञानेश्वरी निवासस्थानी छापे टाकण्यात आले.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयकर विभागानं नागपुरातील घरी छापे टाकले तेव्हा अनिल देशमुख व त्यांची दोन्ही मुलं घरी नव्हती. त्यांच्या पत्नी व काही खासगी कर्मचारी घरी होते. आयकर अधिकाऱ्यांचे सर्च ऑपरेशन अद्यापही सुरू आहे.