अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांना अटक होण्याची शक्यता, सीबीआयचं पथक नागपुरच्या घरी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआय नं छापा टाकला आहे. सीबीआय चा देशमुख यांच्या निवासस्थानी दुसरा छापा आहे. महत्वाचं म्हणजे यावेळी सीबीआय देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांचा अटक वॉरंट घेऊन आलीय.

    नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी सीबीआय नं छापा टाकला आहे. सीबीआय चा देशमुख यांच्या निवासस्थानी दुसरा छापा आहे. महत्वाचं म्हणजे यावेळी सीबीआय देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख आणि सून रिद्धी देशमुख यांचा अटक वॉरंट घेऊन आलीय. सकाळी 8 वाजता सीबीआय चे सहा अधिकारी देशमुख यांच्या निवासस्थानी पोहचले.

    दरम्यान सलील देशमुख आणि रिद्धी देशमुख नागपूरात नाहीत. मात्र, काही कर्मचारी निवासस्थानी आहेत. त्यांच्याकडून माहिती घेण्याचं काम अधिकारी करताहेत. 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर सीबीआय, ईडी आणि आयकर विभागानं देशमुख यांच्यावर कारवाईचा फास आवळला आहे. मात्र, देशमुख यांना वारंवार समन्स बजावूनही चौकशीला सामोरं जात नाहीय. त्यामुळं तपास यंत्रणा आता त्यांच्या कुटुंबियांभोवती फास आवळताना दिसते आहेत. त्यातूनच सीबीआय ची टीम आज देशमुख यांच्या निवासस्थानी त्यांचा मुलगा आणि सुनेचा अटक वॉरंट घेऊन पोहचली.अशी माहिती समोर आली आहे.