बुद्धपौर्णिमेला होणारी प्राणिगणना टळली; वन्यप्राणी न्याहाळण्याची परंपरेला फाटा, वन्यजीवप्रेमींच्या आनंदावर विरजण

बुद्धपौर्णिमेला होणाऱ्या वन्यप्राणी गणनेला (the wildlife census on Buddhapurnima) सलग दुसऱ्या वर्षी करोनाचा फटका बसला आहे. येत्या २६ मे रोजी बुद्धपौर्णिमा असून पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरील वन्यप्राणी न्याहाळण्याची परंपरा (the tradition of watching wildlife) सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली आहे. वन्यजीवप्रेमींच्या आनंदावर सलग दुसऱ्या वर्षी विरजण पडले आहे. (wildlife enthusiasts are delighted)

  नागपूर (Nagpur).  बुद्धपौर्णिमेला होणाऱ्या वन्यप्राणी गणनेला (the wildlife census on Buddhapurnima) सलग दुसऱ्या वर्षी करोनाचा फटका बसला आहे. येत्या २६ मे रोजी बुद्धपौर्णिमा असून पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावरील वन्यप्राणी न्याहाळण्याची परंपरा (the tradition of watching wildlife) सलग दुसऱ्या वर्षी खंडित झाली आहे. वन्यजीवप्रेमींच्या आनंदावर सलग दुसऱ्या वर्षी विरजण पडले आहे. (wildlife enthusiasts are delighted)

  भारतातील जंगलात वाघांसह इतरही वन्यप्राण्यांची संख्या किती, हे मोजण्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थेने पाऊलखुणा आणि पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या आधारावर वन्यप्राणी गणना सुरू केली. त्यासाठी पाणवठ्याशेजारी मचाण उभारून त्यावरून वन्यजीवांचे निरीक्षण करण्यात येते. वन्यजीव संवर्धन कार्यात अधिकाधिक लोकसहभाग मिळावा, यासाठी वन्यजीवप्रेमींनाही यात सहभागी करून घेतले जाते. बुद्धपौर्णिमेला चंद्राचा प्रकाश इतर पौर्णिमांपेक्षा अधिक लख्ख असल्याने यादिवशी ही गणना करण्यात येते.

  दरम्यान, स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवींचा गोंधळ पाहता हा उपक्र म काही वर्षांपूर्वी बंद करून भारतीय वन्यजीव संस्थेने सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘ट्रान्झॅट लाईन मेथड’ही नवीन पद्धती वन्यप्राणी गणनेसाठी विकसित के ली. या माध्यमातून दर चार वर्षांनी होणाऱ्या गणनेतील आकडेवारी अधिकृतरित्या गृहीत धरली जाते. त्यानंतरही वनखात्याने स्वबळावर पाणवठ्यावरील गणनेचा हा उपक्र म जनजागृतीसाठी सुरूच ठेवला. या गणनेतील वन्यप्राण्यांची आकडेवारी अधिकृ तपणे गृहीत धरली जात नसली तरीही गणनेत सहभागी होणाऱ्या वन्यजीवप्रेमींना अभ्यासासाठी ती उपयुक्त ठरते. मात्र, काही वर्षांपूर्वी पेंच व्याघ्रप्रकल्पाचे तत्कालीन क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी त्याला व्यावसायिक स्वरूप दिले.

  पाणवठ्यावरील गणनेकरिता मचाणवर बसण्याकरिता ५०० ते २००० रुपये घेण्यात येऊ लागले. सहभागींना टी-शर्ट, पिशवी, पुस्तके , जेवण असा अंतर्भाव या निधीत करण्यात आला. इतर व्याघ्रप्रकल्प, अभयारण्य तसेच राष्ट्रीय उद्यानांमध्ये हाच कित्ता गिरवण्यात आला. जनजागृतीच्या नावावर होणाऱ्या या गणनेत फक्त श्रीमंतांनाच संधी मिळत गेली. वन्यजीव विभागामार्फत होणारी ही गणना नंतर प्रादेशिक वनखात्यानेही सुरू के ली. त्यांनी या गणनेत सहभागी होण्यासाठी जंगलालगतच्या गावकऱ्यांना प्राधान्य दिले. एकही रुपया न घेता संधी देण्यात आलेले हे गावकरी आजही वनखात्याच्या संपर्कात असून खात्याच्या कार्यात मदत करत आहेत.

  त्यामुळे जनजागृतीचा उद्देश खऱ्या अर्थाने प्रादेशिक वनखात्याने यशस्वी करून दाखवला. मात्र, सलग दोन वर्षांपासून पाणवठ्यावरील गणनेवर करोनाचे सावट आहे. मागील वर्षी सात मे रोजी बुद्धपौर्णिमा होती. मात्र, २४ मार्चपासून देशभरात टाळेबंदी असल्याने ही गणना स्थगित करण्यात आली. तर यावर्षीदेखील ३१ मे पर्यंत टाळेबंदी असल्याने दुसऱ्यांदा ही गणना स्थगित करण्यात आली.

  शिकाऱ्यांना रोखण्याचे आव्हान
  बुद्धपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांची शिकार करणे शिकाऱ्यांसाठी सहज शक्य आहे. मात्र, गणनेमुळे शिकाऱ्यांचे हे ध्येय साध्य होत नव्हते. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यात मागील वर्षी शिकाऱ्यांनी याचा फायदा घेतला होता. पाणवठ्याशेजारी लावलेल्या कॅ मेरा ट्रॅपमुळे घटना उघडकीस आली आणि तीन शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे यावर्षीदेखील वनखात्याला शिकाऱ्यांना रोखण्याचे आव्हान आहे.