‘या’ कारणासाठी डॉन अरुण गवळीने केली संचित रजेची मागणी, पॅरोल-फर्लो रजा ठरतोय चर्चेचा विषय, काय आहे कारण?

फर्लोचा अर्ज कारागृह प्रशासनाने नामंजूर केल्यानंतर गवळीने न्यायालयात धाव घेतली आहे. अरुण गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अरुण गवळीच्या पॅरोल-फर्लो रजा हा चर्चेचा विषय ठरला आहेत.

    नागपूर : डॅडी या नावाने कुख्यात असलेला डॉन अरूण गवळीने संचित रजेची मागणी केली आहे. गवळीने २८ दिवसांच्या संचित रजेची मागणी केली असून कुटुंबाला भेटण्यासाठी ही मागणी त्यांनी केल्याचं समजलं जात आहे. परंतु फर्लोचा अर्ज कारागृह प्रशासनाने नामंजूर केल्यानंतर गवळीने न्यायालयात धाव घेतली आहे. अरुण गवळी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. अरुण गवळीच्या पॅरोल-फर्लो रजा हा चर्चेचा विषय ठरला आहेत.

    उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस देत तीन आठवड्यात याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून तो सध्या नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आहे. अरुण गवळी हा यापूर्वी किमान ८ वेळा कारागृहातून बाहेर आला आल्याची माहिती आहे.

    दरम्यान, अरुण गवळी काही महिन्यांपूर्वीच आजोबा झाला. त्याची मुलगी योगिता गवळी-वाघमारे (Yogita Gawli) आणि जावई-अभिनेता अक्षय वाघमारे (Akshay Waghmare) यांना मुलगी झाली. त्यामुळे नातीला बघण्यासाठी अरुण गवळी सुट्टीवर येऊ इच्छित असल्याची शक्यता वर्तवली जातआहे.