अथर्व मित्रांना फोन कॉन्फरन्सवर म्हणाला, आईची काळजी घ्याल! आणि घेतली तलावात उडी

नागपुरातील अथर्व आनंदेवार (Atharva Anandewar) नामक तरुणाने सोमवारी दुपारी भरधाव दुचाकीसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. (committed suicide by jumping into a lake with his two-wheeler) या घटनेचा पोलिस बारकाईने तपास (closely investigated by the police) करीत आहे. अथर्व प्रचंड मानसिक तणावात (mental stress) होता .....

    नागपूर (Nagpur).  नागपुरातील अथर्व आनंदेवार (Atharva Anandewar) नामक तरुणाने सोमवारी दुपारी भरधाव दुचाकीसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती. (committed suicide by jumping into a lake with his two-wheeler) या घटनेचा पोलिस बारकाईने तपास (closely investigated by the police) करीत आहे. अथर्व प्रचंड मानसिक तणावात (mental stress) होता, असे प्राथमिक तपासात उघड झाले.

    मृत तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या काही मित्रांना कॉन्फरन्स कॉल (Conference call with friends) करून आत्महत्या करत असल्याची माहिती दिली होती. तसेच आपल्या आईची काळजी घ्या असंही मृत तरुणानं आपल्या मित्रांना सांगितलं होतं. संबंधित तरुण आत्महत्या करणार असल्याची माहिती मित्रांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता.

    अथर्व राजू आनंदेवार असं आत्महत्या करणाऱ्या 19 वर्षीय तरुणाचं नाव असून तो पॉलिटेक्निकचा पहिल्या वर्षात शिकत होता. सोमवारी दुपारी ही थरारक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. हसत्या खेळत्या मुलानं अशा प्रकारे आत्महत्या केल्यानं आनंदेवार कुटुंबीयांची पायाखालची जमीनच सरकली आहे. मृत अथर्वला एक मोठा भाऊ असून तो एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे. तर वडील टाईल्स कंपनीत कामाला आहेत.
    खरंतर, सोमवारी सकाळपासूनच अथर्व काहीसा तणावात होता. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास त्यानं आपल्या तीन मित्रांना कॉन्फरन्स कॉल लावला आणि आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. यावेळी अथर्वनं मित्रांशी बोलताना सांगितलं की, ‘मी आत्महत्या करतोय माझ्या आईकडं लक्ष द्या’. असं बोलल्यानंतर मित्रांनाही धक्का बसला. मित्रांना त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यानं कोणाचही न ऐकता आपल्या दुचाकीसह तलावात उडी मारली.

    या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर, त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत फुटाळा तलावात शोध मोहीम राबवली. काही वेळानं अथर्वचा मृतदेह आणि बाइक बाहेर काढण्यात आली आहे. पोलिसांनी अथर्वचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अथर्वनं आत्महत्या नेमक्या कोणत्या कारणासाठी केली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पोलीस आत्महत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.