पैसे न दिल्याने तृतीयपंथियांचा कुटुंबीयांवर हल्ला; टीव्ही, फ्रीजची केली तोडफोड

अंकुश मुनेश्वर यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरुन तृतीयपंथीयांनी अंकुशशी हुज्जत घातली. वादावादीनंतर तृतीयपंथी तिथून निघून गेले; पण दुसऱ्या दिवशी 15 ते 20 तृतीयपंथी रिक्षाने अंकुशच्या घरी दाखल झाले आणि शिवीगाळ करत घरात घुसले.

    नागपूर (Nagpur) : श्रावण सोमवारचा कार्यक्रम (Shravan Monday program) करण्याच्या नावाखाली तृतीयपंथियांनी (Third Gender Persons) वस्तीत शिरून हप्तावसुली (collecting installments) सुरू केली; मात्र यास विरोध करणाऱ्या एका कुटुंबीयांवर तृतीयपंथियांनी घरात शिरून हल्ला चढविला आणि घरातील टीव्ही, फ्रीजची तोडफोड (vandalized TV and fridge) केली. नागपूरच्या (​​Nagpur) हिंगणा परिसरातील (Hingana area) नीलडोह गावात (Neeldoh village) अलीकडेच ही धक्कादायक घटना घडली.

    नेमकी घटना काय?
    नागपूरच्या हिंगणा परिसरातील नीलडोह गावात श्रावण महिना असल्याचं निमित्त सांगून तीन-चार तृतीयपंथीयांनी वर्गणी गोळा करायला सुरुवात केली. यावेळी अंकुश मुनेश्वर यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावरुन तृतीयपंथीयांनी अंकुशशी हुज्जत घातली. वादावादीनंतर तृतीयपंथी तिथून निघून गेले. पण दुसऱ्या दिवशी 15 ते 20 तृतीयपंथी रिक्षाने अंकुशच्या घरी दाखल झाले आणि शिवीगाळ करत घरात घुसले.

    घरात घुसून तृतीयपंथीयांनी घरातील टीव्हि, फ्रीज व इतर वस्तूंची तोडफोड केली. तसंच अंकुश आणि त्याच्या 57 वर्षीय आईला मारहाण केल्याचा आरोप अंकुश मुनेश्वर यांनी केला आहे. हा सगळा प्रकार पाहून गावकरी जमा झाले आणि त्यांना तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली.

    एमआयडीसी प्रभारी ठाणेदार उमेश बेसरकर पथकासह घटनास्थळी पोहचले आणि सर्व तृतीयपंथीयांना ताब्यात पोलीस ठाण्यात आणलं. तोडफोड आणि धिंगाणा घालणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.