प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पालकांनी लॉकडाउन काळात (the lockdown period) मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी (online education) Android phones घेऊन दिले. मात्र, नागपुरातील एका 'टीनएजर्स' विद्यार्थिनीला (teenage student) अभ्यासासोबतच ऑनलाईन व्हिडिओ गेम (to play online video games) खेळणे चांगलेच महागात पडले आहे. दरम्यान तिची एका रोहित राजपूत उर्फ बॅड शहजाद (Rohit Rajput alias Bad Shahzad) नावाच्या मुलाशी .....

    नागपूर (Nagpur). पालकांनी लॉकडाउन काळात (the lockdown period) मुलांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी (online education) Android phones घेऊन दिले. मात्र, नागपुरातील एका ‘टीनएजर्स’ विद्यार्थिनीला (teenage student) अभ्यासासोबतच ऑनलाईन व्हिडिओ गेम (to play online video games) खेळणे चांगलेच महागात पडले आहे. दरम्यान तिची एका रोहित राजपूत उर्फ बॅड शहजाद (Rohit Rajput alias Bad Shahzad) नावाच्या मुलाशी ऑनलाईन ओळख झाली आणि मुलीने मुलाच्या सांगण्यावरून स्वतःचाच अश्लील व्हिडिओ बनवून त्याला पाठविला. कथित शहजादने पैशासाठी मुलीचे ब्लॅकमेलिंग करत तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला (video viral on social media). पीडितेच्या आईला ही घटना माहिती होताच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. (lodged a complaint with the police)

    काय आहे नेमकं प्रकरण?
    संबंधित पीडित विद्यार्थिनी आठवीच्या वर्गात शिकत आहे. मागील काही काळापासून तिला ‘फ्री फायर गेम’ (free fire game) चा छंद लागला होता. ही गेम खेळण्यासाठी कोणत्याही एका पार्टनरची आवश्यकता असते. यासाठी तिने रोहित राजपूत ऊर्फ बॅड शहजाद नावाच्या युवकाला पार्टनर म्हणून घेतलं. यातून दोघांची चांगली ओळख झाली. Whatsapp नंबरची देवाण-घेवाण देखील झाली. यानंतर आरोपीनं तिचा विश्वास संपादन करून मैत्री वाढवली. प्रेमाच्या जाळ्यात ओढून आरोपीनं तिला न्यूड फोटोची आणि व्हिडीओ पाठवण्यास भाग पाडलं.

    दरम्यान दोघं मागील काही दिवसांपासून हा गेम खेळतंच होते. पण गेम हरल्यानंतर पीडितेनं आरोपीला 2200 रुपये देणं आवश्यक होतं. पण तिच्याकडे पैशे नसल्यानं ती आरोपीला पैसे देऊ शकली नाही. पण आरोपीनं पैशांसाठी तिच्याकडे तगादा लावला. यानंतर पीडितेनं पैसे देण्यास थेट नकार दिला. यानंतर आरोपीनं पैशाच्या बदल्यात अश्लील व्हिडीओ पाठवण्यास सांगितले. पण पीडितेनं नकार दिला. त्यामुळे आरोपीनं जुने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेनं आरोपीला व्हिडीओ पाठवला. त्याचबरोबर पैसे नसल्यानं मुलीनं आरोपीला ब्लॉक केलं.

    यामुळे चिडलेल्या आरोपीनं पीडितेचे अश्लील फोटो सोशल मीडियात व्हायरल केले. हे प्रकरण उघडकीस येताचं पीडितेच्या आईनं हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित राजपूत ऊर्फ बॅड शहजाद असं आरोपी युवकाचं नाव आहे. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात आहे.