anil deshmukh

नागपूर.  उपराजधानीसह जिल्ह्यात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनाच्या प्रकोपावर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक पावले उचला, असे निर्देश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. तसेच मास्क न घालता घराबाहेर फिरणाऱ्यांवर आता २०० ऐवजी ५०० रुपये दंड करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. विभागीय कार्यालयात रविवारी बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पालकमंत्री नितीन राऊतही उपस्थित होते. सोमवारपासून मास्क न वापरणाऱ्यांवर ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांवर जबाबदारी केली निश्चित

जिल्ह्यात संक्रमित रुग्णांसह मृत्युमुखी पडणाऱ्यांची ' संख्या चिंताजनक आहे. भविष्यात मृत्यूदर कमी करण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न करायचे आहे. अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडाव्यात. बेड मॅनेजमेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची जबाबदारी वैद्यकीय यंत्रणेसोबत जुळलेल्या प्रशासकीय अनुभवी आधिकऱ्यांनी सांभाळण्याचे निर्देश गृहमंत्री व पालकमंत्र्यांनी दिले. या बैठकीला पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार, मनपाचे अतिरिक्त आयुक्‍त जलज शर्मा, कोविड-19चे नोडल अधिकारी तया वस्त्रोद्योग संचालिका डॉ. माधवी खोडे, मिताली सेठी, मनीष खत्री, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्‍त आयुक्‍त राम जोशी, उपायुक्‍त मिलिंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांची, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, आरोग्य उपसंचालक डॉ. ' संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र . पातुरकर, डीन डॉ. अजय केवलिया, डीन डॉ. सुधीर गुप्ता, डॉ. अविनाश गावंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.