फूड ॲपवरून ऑर्डर करणाऱ्यांनो सावधान!; अनेक हॉटेल्सजवळ परवानाच नाही

काही दिवसांपूर्वीच एफडीएने अस्वच्छ किचनमध्ये अन्न तयार करण्यावरून कारवाईही केली होती परंतु आजही अनेक लहान-मोठे हॉटेल्सधारक घाणेरड्या किचनमध्ये अन्न शिजवून लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे. अनेकांजवळ परवानाही नाही.

  • हॉटेलचे किचन किती स्वच्छ?

नागपूर. हॉटेल व रेस्टॉरेंटमध्ये भोजन करणे व मागविणे आता सर्वसामान्य  बाब झाली आहे. परंतु हे अन्न कोणत्या ठिकाणी तयार होते व तेथे साफसफाईकडे किती लक्ष दिल्या जाते, याचा आपण कधी विचार केला का? काही दिवसांपूर्वीच एफडीएने अस्वच्छ किचनमध्ये अन्न तयार करण्यावरून कारवाईही केली होती परंतु आजही अनेक लहान-मोठे हॉटेल्सधारक घाणेरड्या किचनमध्ये अन्न शिजवून लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहे. अनेकांजवळ परवानाही नाही. परंतु आता पुन्हा कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता लोकांनी सतर्क झाले पाहिजे. ओळखीच्या हॉटेल्समधूनच भोजन मागितले पाहिजे.

ऑनलाईन भोजन मागण्याचे वाढले चलन
धकाधकीच्या जीवनात बाहेरचे खाणे-पिणे नाईलाज तर आहे, सवडीतही काही चांगले खायचे असल्यास तेव्हाही रेस्टॉरेंटचीच आठवण येते. त्यातही ऑनलाईन असल्याने घरपोच सुविधा मिळते. परंतु आपल्याला हे माहित होत नाही की, ज्या रेस्टॉरेंट किंवा हॉटेलमधून भोजन मागवित आहोत, तिथे अन्न स्वच्छ व साफ किचनमध्ये केले जाते की नाही. अनेक रेस्टॉरेंटमध्ये अस्वच्छ किचनमध्ये अन्न शिजवून लोकांच्या आरोग्याशी खेळ करण्यासोबतच अन्न सुरक्षाचे उल्लंघन केले जात आहे.