प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून (the third wave of Corona) लहान मुलांचा (Children) बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) फार महत्त्वाची ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची (Bharat Biotech vaccine) लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू झाली आहे.

  नागपूर (Nagpur).  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून (the third wave of Corona) लहान मुलांचा (Children) बचाव करण्यासाठी कोविड प्रतिबंधक लस (Covid vaccine) फार महत्त्वाची ठरणार आहे. याचाच एक भाग म्हणून आता भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसीची (Bharat Biotech vaccine) लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू झाली आहे. देशभरातील एकूण चार ठिकाणी हे क्लिनिकल ट्रायल होणार आहे. त्यात नागपूर शहराचाही (Nagpur, Maharashtra) समावेश आहे. आज नागपूर शहरात लहान मुलांवर लसीच्या प्राथमिक चाचणीला सुरुवात झाली.

  नागपूरमध्ये 2 ते 6 वयोगटातील मुलांचं क्लिनिकल ट्रायल होणार आहे. नागपूरच्या मेडिट्रेना हॉस्पिटलमध्ये कोव्हॅक्सिन हे ट्रायल आहे. या आधी 6 ते 12 आणि 12 ते 18 या वयोगटातील मुलांचे क्लिनिकल ट्रायल झाले.

  गुरुवारी या क्लिनिकल ट्रायलसाठी लागणाऱ्या मुलांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. आज जे स्क्रिनिंग टेस्ट पास होईल ते क्लिनिकल ट्रायलसाठी पात्र असणार आहे.

  एकूण तीन टप्प्यात हे ट्रायल होत आहे. पहिल्या टप्प्यात 12 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणी, दुसऱ्या टप्प्यात 7 ते 11 वयोगटातील मुलांवर चाचणी आणि तिसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वयोगटातील मुलांवर चाचणी होत आहे. आता याचा तिसरा टप्पा सुरु आहे. या क्लिनिकल ट्रायलमध्ये मुलांची रक्ताची तपासणी होते त्यानंतर मुलांवर क्लिनिकल ट्रायल केलं जातं.

  लहान मुलांना लस देण्याचे फायदे :
  —  हर्ड इम्युनिटी तयार होण्यास मदत
  —  मुलांच्या लसीकरणानंतर कोरोनाचा धोका कमी
  — कोरोना पसरण्याची शक्यता कमी
  — संपर्कात येणाऱ्यांचा जीव वाचू शकतो.