नागपुरात भाजपला मोठा धक्का ! ३१ नेते आणि पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जिल्ह्यातील वाडीमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह भाजपच्या 31 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. सर्व पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचं या पदाधिकाऱ्यांचं मत आहे.

    नागपूर (Nagpur).  जिल्ह्यातील वाडीमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह भाजपच्या 31 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. सर्व पदाधिकारी लवकरच राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचं या पदाधिकाऱ्यांचं मत आहे. पण यामुळे वाडी नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर असताना, भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. भाजप सोडलेले हे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

    भारतीय जनता पक्षात अन्यायकारक आणि पक्षपाती कार्यप्रणाली असल्याचा आरोप करत जिल्हा भाजपचे माजी महामंत्री, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पक्ष सोडला. याचा वाडीच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

    भाजपला धक्क्यावर धक्के
    भाजप नेते संजय साडेगावकर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचा झेंडा हाती धरला. संजय साडेगावकर हे परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी आहेत. राठोड यांच्यासह जिल्ह्यातील 50 ते 55 जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजपला जोरदार धक्के देताना दिसत आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला जोरदार धक्का बसला होता.

    कालिदास कोळंबकरांचे समर्थक शिवबंधनात
    त्यानंतर शिवसेनेने भाजपाला आणखी एक धक्का दिला. भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांचे कडर समर्थक मानले जाणारे अँटॉप हिल वडाळा (पूर्व) येथील अनिल कदम आणि दोन टर्म नगरसेविका राहिलेल्या माजी
    नगरसेविका प्रेसिला कदम तसेच भाजपा प्रणित बेस्ट संघटनेचे कार्याध्यक्ष विवेक घोलप यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.

    भाजपात मोठया प्रमाणात आऊटगोईंग
    कदम यांचा हा प्रवेश आमदार कोळंबकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे भाजपा मुंबई मनपा जिंकण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र भाजपात मोठया प्रमाणात आऊटगोईंग सुरु झालं आहे. या पक्षप्रवेशावेळी विभागप्रमुख मंगेश सातमकर, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि नगरसेवक अमेय घोले उपस्थित होते.