नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत मोठी घसरण; शनिवारी ०२ रुग्णांची नोंद

नागपूर शहरात शनिवारी Corona Active रुग्णांचे प्रमाणही घटल्याचे जाणवून आले. आज केवळ ८२ कोरोना Active रुग्ण आढळले. जेव्हा की, मागील काही दिवसांपूर्वी Active रुग्णांची आकडेवारी 100च्या पलीकडे होती.

    नागपूर (Nagpur) :  मनपा प्रशासनाच्या (the municipal administration) आरोग्य विभागाने (The health department) कोरोनाची संभाव्य तिसरी लाट (third wave of corona) रोखण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या (the number of corona patients) शून्यावर आणणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

    मनपाकडून करण्यात येत असलेल्या सकारात्मक प्रयत्नांचे फलित दिसू लागले आहेत. आरोग्य विभागाकडून शनिवारी  प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात आज केवळ ०२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला.

    नागपूर शहरात शनिवारी Corona Active रुग्णांचे प्रमाणही घटल्याचे जाणवून आले. आज केवळ ८२ कोरोना Active रुग्ण आढळले. जेव्हा की, मागील काही दिवसांपूर्वी Active रुग्णांची आकडेवारी 100च्या पलीकडे होती. योग्य उपचारांमुळे नागपुरातील ०८ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण आकडेवारी बघता शहरातील आतापर्यंत ०३ लाख ३४ हजार ७१ रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आज कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. आज ३३१२ रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली.

    नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरात शनिवारपर्यंत ११ लाख ०८ हजार ८५६ रुग्णांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. याप्रमाणे ०४ लाख ६१ हजार ७७८ रुग्णांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली. शहरातील एकूण लसीकरणाची आकडेवारी १५ लाख ७० हजार ६३४ इतकी नोंदविण्यात आली.