नागपूर येथील दीक्षाभूमी उघडण्याकरिता भाजपतर्फे आंदोलन

    नागपूर (Nagpur ) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने धार्मिक स्थळे उघडण्यात यावी ह्यासाठी महाराष्ट्रभरात आंदोलन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज नागपूर येथे दीक्षाभूमी उघडण्याकरिता भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले.

    भाजपचे प्रदेश सचिव Adv. धर्मपाल मेश्राम यांचा नेतृत्वात आयोजित या आंदोलनात माजी आमदार मिलिंद माने यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते. यावेळी राज्य सरकार विरोधात नारे निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपने दीक्षाभूमी सुरू करावी अशी जोरदार मागणी केली आहे.