भाजपची ‘बुथ अभियानाची’ घोषणा; पण कार्यकर्ते आणणार तरी कुठून? नगरसेवकांची डोकेदुखी वाढली

बुथनिहाय बुथप्रमुख (booth head) आणि त्यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांची कार्यकारिणी तयार केली जात आहे. त्याची जबाबदारी त्या त्या भागातील प्रत्येक नगरसेवक (corporator) व पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र अनेक प्रभागांमध्ये पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे भाजपला (the BJP) कार्यकर्ता मिळत नसल्याने नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

  नागपूर (Nagpur) : महापालिका निवडणुकीच्या (Nagpur Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर गेल्या दहा बारा दिवसांपासून शहरात भारतीय जनता पक्षाच्यावतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियानांतर्गत (Dr. Shyamaprasad Mukherjee Samarth Booth Campaign) बुथनिहाय बुथप्रमुख (booth head) आणि त्यांच्या नेतृत्वाखाली २५ जणांची कार्यकारिणी तयार केली जात आहे. त्याची जबाबदारी त्या त्या भागातील प्रत्येक नगरसेवक (corporator) व पदाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. मात्र अनेक प्रभागांमध्ये पक्षातील अंतर्गत नाराजीमुळे भाजपला (the BJP) कार्यकर्ता मिळत नसल्याने नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

  महापालिकेत गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. आता पुन्हा एकदा सत्ता आणण्यासाठी शहरात संघटनात्मक बांधणीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नगरसेवकांना आपापल्या प्रभागात बुथ प्रमुख व त्यांच्या नेतृत्वात २५ कार्यकर्त्यांची चमू तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु, अनेक कार्यकर्ते नाराज असल्याने प्रभाग बुथ रचनेसाठी नगरसेवकांची दमछाक होत आहे. पूर्व, मध्य, दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि उत्तर नागपुरातील अनेक प्रभागात पक्षाला कार्यकर्तेही मिळत नाहीयेत.

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातही असेच चित्र आहे. एका प्रभागातील BJP बुथच्या बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी बहिष्कार टाकत नाराजी दर्शवली. शहरात १८०० बुथ असून प्रत्येक बुथमध्ये ३० कार्यकर्त्यांचे एक पथक तयार करणे प्रस्तावित आहे. मात्र अभियान सुरू झाल्यापासून आतापर्यंत केवळ २३० बुथमध्येच कार्यकारिणी तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  महापालिकेच्या निवडणुका सात महिन्यांवर आल्याने विविध राजकीय पक्ष संघटनात्मक काम वाढवण्यासाठी कामाला लागले आहेत. भाजपकडे असलेल्या प्रभागात मात्र नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. नगरसेवकांना विकास कामांसाठी निधी मिळत नाही. निधी मिळाला तरी त्या दृष्टीने नियोजन नाही. परिणामी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याशिवाय पक्षातील निष्ठावंतांना डावलून दुसऱ्यांना प्रमुख पदे दिली जात आहेत. त्यामुळे अंतर्गत नाराजीचा फटका बुथ रचनेत बसत आहे.

  आगामी महापालिका
  निवडणुकीत विद्यमान नगरसेवकासह इच्छुकांची पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू असताना बुथ रचनेसाठी कार्यकर्ते मिळत नसल्यामुळे त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.