
नागपूर : भाजप नेते आशिष शेलार तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. शनिवारी संध्याकाळी त्यांचे नागपुरात आगमन झाले.
विधान परिषद निवडणुकीत झालेल्या पराभवाचा या दौऱ्यात अभ्यास करत असून त्यांनी सकाळपासून सुमारे शंभर कर्यकर्त्यांशी थेट संवाद साधला आहे. उद्या ते अमरावती जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे सत्यशोधन करण्यासाठी केंद्रीय पक्ष श्रेष्ठींनी वेगवेगळ्या नेत्यांची नेमणूक केली आहे. या अंतर्गत शेलार तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत.