blue moon

नागपूर. ऑक्टोबरला चंद्र मेष राशीत ७ अंश ११ कला व २४ विकलावर राहणार असून त्याचे पूर्ण दर्शन होणार आहे (blue moon) साधारणत: दर महिन्यात एकदाच पूर्ण चंद्र दिसतो. परंतु, ऑक्टोबर महिन्यात दोनदा हा योग आला आहे. २ ऑक्टोबरनंतर ३१ ऑक्टोबरला हा योग येत आहे. ज्यावेळी एकाच महिन्यात दोनदा असे पूर्ण चंद्र दर्शन होते, त्यावेळी दुसऱ्या पूर्ण चंद्र दर्शनाला ब्ल्यू मून दर्शन असे म्हणतात, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्यांनी सांगितले.

३० जून २००७ ला अशी घटना घडली होती. ३१ ऑक्टोबरनंतर असा योग आता थेट ३० सप्टेंबर २०५० येईल. अर्थात ३१ जानेवारी व ३१ मार्च २०१८ ला आपण ब्ल्यू मून बघितला होता. अशा रितीचा ब्ल्यू मून ज्योतिषशास्त्रानुसार ३१ ऑगस्ट २०२३ ला बघता येईल, असेही ज्योतीष्यांनी सांगितले. उगवणारा चंद्र खरेतर लालसर रंगाचा असतो. परंतु चंद्र जेव्हा क्षितिजापासून भ्रमण करताना अधिक उंचावर पोहोचतो तेव्हा पृथ्वीवरील परावर्तित प्रकाशामुळे चंद्र पांढऱ्या रंगाचा दिसतो. त्यात यावेळी करड्या छटा मिसळल्यामुळे तो निळसर भासू लागतो. मात्र ब्ल्यू मून व्याख्येचा व त्याच्या रंगाचा काहीही संबंध नाही.
या ब्ल्यू मून प्रसंगामुळे ‘वन्स इन अ ब्ल्यू मून’ असे म्हणण्याची प्रथा १७व्या शतकापासून सुरू झाली, अशी माहिती ज्योतीष्यांनी दिली.