व्यवसायाने आणले लग्नात विघ्न; ५०० मुली पाहिल्या पण लग्नासाठी एकही ‘हो’ म्हणेना !

लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून, ही म्हणं सध्या तंतोतंत खरी ठरत आहे. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे या खुळ्या समजापोटी मागील काळात मुलींची गर्भातच हत्या करण्यात आली. आता मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटत असल्याने शिकलेल्या मुलींच्या भावी जोडीदाराविषयक अपेक्षा आकाश ठेंगणे करणाऱ्या आहेत.

    नागपूर (Nagpur).   लग्न पहावे करून आणि घर पहावे बांधून, ही म्हणं सध्या तंतोतंत खरी ठरत आहे. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच पाहिजे या खुळ्या समजापोटी मागील काळात मुलींची गर्भातच हत्या करण्यात आली. आता मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या घटत असल्याने शिकलेल्या मुलींच्या भावी जोडीदाराविषयक अपेक्षा आकाश ठेंगणे करणाऱ्या आहेत. पॅकेजधारी नवरा पाहिजे. बिझनेसमॅन नकोच, अशा अपेक्षा प्रत्येकच मुलीच्या आहे. सधा याचे गंभीर परिणाम लग्नासाठी मैदानात उतरलेल्या बिझनेसमॅन मुलांना भोगावा लागत आहेत.

    आता नागपुरच्या रितेशचचं उदाहरण घ्या ना! मेहनतीच्या बळावर ट्रान्सपोर्ट व्यवसाय उभा करणाऱ्या रितेशने आतापर्यंत 500 पेक्षा जास्त मुली पाहिल्या. पण कुठलीही मुलगी त्याला लग्नासाठी होकार द्यायला तयार नाही. नागपुरात एक आत्मनिर्भर तरुण शिक्षण, पैसै, गाडी, घरं सगळं काही असूनही समस्येत आहे. अर्थात याला कारणही तसंच आहे. रितेश झुनके नावाच्या मुलाने माध्यमांशी बोलताना आपली व्यथा मांडली आहे.

    नोकरीऐवजी ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात आपल्या पायावर उभं राहून यश मिळवलेल्या ४० हजार रुपये महिना कमावणाऱ्या आत्मनिर्भर रितेशने स्वतःच्या लग्नासाठी आजवर अनेक स्थळं पाहिली आणि मुलीच्या कुटुंबियांशी संवादही साधला. इतकंच नाही तर विवाह मेळाव्यात सहभाग नोंदवले, मेट्रीमॉनियल साईट्सवर नोंदणी केली. मात्र अजूनही लग्नाला एकही मुलगी तयार झालेली नाही. नोकरीवालाच नवरा हवा असं अनेक मुलीचं म्हणणं होतं. कारण ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात असलेल्या मुलींना चांगल्या सवयी नसतात असा काहीसा त्यांचा समज आहे. या सगळ्यामुळे या तरूणाला नैराश्याचा सामना करावा लागतोय.

    रितेशनं एका मालवाहतूक व्यवसायाची सुरूवात केली. नोकरी सोडून स्वतःची वाहनं घेतली आणि या व्यवसायाला कमी कालावधीतच चांगला प्रतिसाद मिळाला. आता (वेल सेट्ल्ड) रितेशच्या कुटुंबातील सगळ्यांनीच त्याच्यासाठी स्थळ शोधण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. नोकरीवालाच नवरा हवा या मुलींच्या दृष्टीकोनाबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यानिमित्तानं तरूणींच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षांवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. कारण मुलींच्या या आग्रहापायी अनेक तरुणांवर अविवाहित राहण्याची वेळ आली आहे असं चित्र पाहायला मिळतंय.