पैशांची अफरातफर करण्याचा आरोप असलेल्या वाहकांची त्याच आगारात बदली नाही; एसटी महामंडळाचा निर्णय

अपहार करणाऱ्या वाहकाची प्रदेशांतर्गत वा प्रदेशाबाहेर बदली केली जाते. बदलीनंतर या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीबाबत काय करावे हा प्रश्न उपस्थित झाला होता. शेवटी महामंडळाने तृतीय व चतुर्थ व त्यानंतरच्या अपहार प्रकरणी प्रदेशांतर्गत तसेच प्रदेशाबाहेर बदली केलेल्या वाहकांबाबत नुकताच एक आदेश काढला आहे.

    नागपूर (Nagpur) : अपहार प्रकरणात बदली होऊन तीन वर्षे पूर्ण केलेल्या वाहकाला ज्या आगारातून त्याची बदली केली तेथेच पुन्हा विनंती बदलीला प्रतिबंध घालण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (Maharashtra State Road Transport Corporation) (एसटी) (ST) याबाबतचे आदेश राज्यातील सर्व विभाग नियंत्रक कार्यालयात (the Divisional Controller’s Offices) नुकतेच पाठवले आहेत. या निर्णयाला काही संघटनांनी विरोध केल्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

    अपहार करणाऱ्या वाहकाची प्रदेशांतर्गत वा प्रदेशाबाहेर बदली केली जाते. बदलीनंतर या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीबाबत काय करावे हा प्रश्न उपस्थित झाला होता. शेवटी महामंडळाने तृतीय व चतुर्थ व त्यानंतरच्या अपहार प्रकरणी प्रदेशांतर्गत तसेच प्रदेशाबाहेर बदली केलेल्या वाहकांबाबत नुकताच एक आदेश काढला आहे.

    त्यानुसार, तीन वर्षे पूर्ण केलेल्या वाहकांनी मूळ विभागामध्ये विनंती बदलीसाठी अर्ज केला तर तेथील रिक्त पदाच्या उपलब्धतेनुसार त्यांची बदली होईल. परंतु ज्या आगारातून दोषी ठरलेल्या वाहकाची प्रशासकीय बदली झाली, त्या आगारात त्यांना पुन्हा सेवेची संधी मिळणार नाही. विभागातील इतर आगारातच त्यांची बदली होईल.