devendra fadanvis

मुख्यमंत्रीपदाच्या प्रभावाखाली येऊन निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांनी पोलीस उपायुक्त विनिता साहू याच्या मदतीने नियमबाह्य पद्धतीने निवडणूक अर्ज स्वीकारल्याचे सीसीटीव्ही फुटेज हा या खटल्यातील महत्त्वाचा पुरावा असल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूरमधील वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खोटी कागदपत्रे सादर करून निवडणूक अर्ज भरण्याचा खटला दाखल केला होता.

नागपूर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यापुढील न्यायालयीन अडचणी वाढल्या आहेत. त्याच्याविरुद्ध अँड. सतीश ऊके यांनी दाखल केलेले सर्व खटले नागपूरच्या न्यायालयात दुसरे अति. मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्या विशेष न्यायालयात वर्गीकृत (Classified in special court) झाले आहेत.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपूर्ण आणि खोट्या माहितीचे प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप असणाऱ्या खटल्याची सुनावणीदेखील यातच होणार आहे. आज (बुधवारी) हा खटला सुनावणीसाठी येणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्रीपदाच्या प्रभावाखाली येऊन निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांनी पोलीस उपायुक्त विनिता साहू याच्या मदतीने नियमबाह्य पद्धतीने निवडणूक अर्ज स्वीकारल्याचे सीसीटीव्ही फुटेज हा या खटल्यातील महत्त्वाचा पुरावा असल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूरमधील वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खोटी कागदपत्रे सादर करून निवडणूक अर्ज भरण्याचा खटला दाखल केला होता.

हा निवडणूक अर्ज भरताना आणि निवडणुकीची कागदपत्रे तयार करताना व ती सुपूर्द करताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपराधी कृत्य झाले आहे व त्याला निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे, पोलीस उपायुक्त विनिता साहू आणि नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी षड्यंत्र रचून मदत केली, असाही आरोप या खटल्यात ठेवण्यात आला आहे.

वकील सतीश उके यांनी निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे, पोलीस उपायुक्त विनिता साहू, महापौर संदीप जोशी यांना सहआरोपी बनविले आहे. गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य करून खोटी कागदपत्रे सादर करून निवडणूक अर्ज भरण्याच्या या खटल्यात आत पुन्हा नव्याने सुनावणी होणार आहे. वकील सतीश उके यांच्या दाव्याप्रमाणे देवेंद्र फडवणीस यांनी निवडणूक अर्ज भरताना अपूर्ण व खोट्या माहितीचे प्रतिज्ञापत्र नामांकन अर्जासोबत दिले आहे.