चिमुकल्याने न्हाव्याला केस कापताना दिली चक्क धमकी! जाणून घ्या नेमका कोण आहे हा छोटा डाॅन?

तुम्ही बालपणी बाबासोबत केप कापायला सलूनमध्ये गेल्याचा प्रसंग आठवा बघू! केस कापताना न्वाव्याच्या हातातील कैची आणि वस्तरा पाहून तुमची नक्कीच रडारड सुरू झाली असणार; पण तो न्हावी तुमच्या अवस्थेकडे कानाडोळा करून तुमचे केस कचाकचा कापित सुटला असणार. पण ट्विटरवर वेगाने व्हायरल होणाÚया या महाशयाची कमालच म्हणावी लागेल बुवा्! वयाने चिमुकला असलेल्या या महाशयांनी त्याचे केस कापणाÚया न्हाव्यालाच चक्क धमकी देऊन अवाक् केले. आता या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात झपाट्याने व्हायरल होतोय.

  • बालकाच्या ‘या’ व्हिडिओला मिळत आहेत हजारो लाईक्स

नागपूर/चंद्रपूर (Nagpur / Chandrapur).  तुम्ही बालपणी बाबासोबत केप कापायला सलूनमध्ये गेल्याचा प्रसंग आठवा बघू! केस कापताना न्वाव्याच्या हातातील कैची आणि वस्तरा पाहून तुमची नक्कीच रडारड सुरू झाली असणार; पण तो न्हावी तुमच्या अवस्थेकडे कानाडोळा करून तुमचे केस कचाकचा कापित सुटला असणार. पण ट्विटरवर वेगाने व्हायरल होणाÚया या महाशयाची कमालच म्हणावी लागेल बुवा्! वयाने चिमुकला असलेल्या या महाशयांनी त्याचे केस कापणाÚया न्हाव्यालाच चक्क धमकी देऊन अवाक् केले. आता या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात झपाट्याने व्हायरल होतोय.

मागील चार ते पाच दिवसांपासून केस कापायला जीवावर आलेल्या एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मुलाच्या निरागस हावभावांनी सोशल मीडिया युजर्सना खूप हसवलं. लहान मुलं केस कापायला अजिबात तयार नसतात. जरी घरच्यांनी जबरदस्ती कापायला बसवलं तरीही रडारड सुरू असते. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमचं लहानपण नक्कीच आठवेल. केस कापण्याची जराही इच्छा नसताना या चिमुरड्याला केस कापावे लागले.

त्याचे हावभाव बघून आईने त्याचा व्हिडिओ घेण्याची सूचना केली. मात्र सोशल मीडियावर अपलोड केलेल्या व्हिडिओला असा उदंड प्रतिसाद मिळेल, अशी कल्पनाही त्याने केली नव्हती. लोकांनी आपल्या घरातील बाळाच्या पहिल्या केस कापण्याच्या प्रसंगाशी हा व्हिडिओ जोडत त्याचा आनंद घेतल्याने हा व्हिडिओ चर्चेत आहे.

अनुश्रुतच्या या व्हिडिओ मागे असलेले हात आहेत ते चंद्रपुरातील त्याच्या घराजवळ असलेल्या हेअर ड्रेसर सुनील सविता यांचे. सुनील दोन पिढ्यांपासून पेटकर परिवाराचे हेयर ड्रेसिंग करत आहेत. अनुश्रुतचे केस कापायचे म्हणून सुनील आनंदात घरी पोहोचले. मात्र या ४ वर्षाच्या गोडुल्याच्या गोड धमक्या ऐकुन ते हसून हसून लोटपोट झाले.

काय विशेष आहे या व्हिडिओत ?
न्हावी जसजसे केस कापत आहे. तसतसा हा चिमुरडा ‘अरे यार…. बाल मत काटो’ असं म्हणत त्याला थांबवत आहे. हा न्हावी केस कापत असताना या चिमुरड्याला वेगवेगळे प्रश्न विचारत आहे. पण प्रश्नांची उत्तर दिल्यानंतरही हा चिमुरडा रागात असतो. त्यानंतर न्हाव्याला प्रेमळ धमकी देण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडिया युजर्स या मुलाच्या क्यूटनेसचे चाहते झाले आहेत. हा व्हिडीओ @Anup20992699 या ट्विटर युजरने २२ नोव्हेंबरला शेअर केला होता. या चिमुरडा आहे तरी कोण असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता.

या चिमुरड्याचे नाव अनुश्रृत आहे. अनुप पेटकर आणि श्रुती पेटकर यांचा हा मुलगा सध्या आपल्या आजोळी चंद्रपुरात आलेला आहे. त्याचे आई-वडील संगणक शिक्षण व्यवसायात नागपुरात कार्यरत आहेत. गोबऱ्या गालाच्या अनुश्रुतचे घरच्यांनी याआधीही अनेक व्हिडिओ तयार केलेत. मात्र चंद्रपुरात आल्यानंतर त्याचे केस कापताना त्याने दाखविलेला लटका राग आणि थेट हेअर ड्रेसरलाच मारण्याची दिलेली गोड धमकी यामुळे नेटकरी या बाळाच्या जणू प्रेमातच पडलेत.