लहान मुलांसाठी कोरोना लस तयार; लवकरच होणार क्लिनिकल ट्रायल

तिसऱ्या कोरोना लाटेचा धोका (Third wave of corona) लक्षात घेता, लवकरच लहान मुलांना नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीची (Corona vaccine for children) क्लिनिकल चाचणी (Clinical Trial) नागपुरातील (Nagpur latest news) होणार आहे. १७ वर्षाखालील मुलांवरील भारत बायोटेकच्या (Bharat Biotech corona vaccine) कोविड-१९ लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी दिल्ली (Delhi news) व पाटणा (Patna news) एम्ससह (AIIMS) नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलने (Meditrina hospital) प्रस्ताव सादर केला होता.

  नागपूर (Nagpur) : तिसऱ्या कोरोना लाटेचा धोका (Third wave of corona) लक्षात घेता, लवकरच लहान मुलांना नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या लसीची (Corona vaccine for children) क्लिनिकल चाचणी (Clinical Trial) नागपुरातील (Nagpur latest news) होणार आहे. १७ वर्षाखालील मुलांवरील भारत बायोटेकच्या (Bharat Biotech corona vaccine) कोविड-१९ लसीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी दिल्ली (Delhi news) व पाटणा (Patna news) एम्ससह (AIIMS) नागपुरातील मेडिट्रिना हॉस्पिटलने (Meditrina hospital) प्रस्ताव सादर केला होता. त्याची परवानगी मेडिट्रिनाला मिळाली आहे. त्यानुसार तीन कॅटेगिरीमध्ये या ट्रायल्स घेण्यात येतील. प्रत्येक गटात २५ मुलांचा समावेश करण्यात येणार आहे.

  जानेवारी महिन्यात एकूण कोरोना बाधितांच्या संख्येत पाच टक्के लहान मुले बाधित झाली आहेत. एप्रिल मध्ये ११ टक्क्याहून अधिक मुलांमध्ये कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुले मोठ्या प्रमाणावर बाधित होण्याचा धोका लक्षात घेत त्यांच्या सुरक्षिततेसाठी भारत बायोटेकद्वारे क्लिनिकल चाचणीचा प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार मेडिट्रिनाद्वारे २ ते १८ वयोगटातील क्लिनिकल ट्र्रायलसाठीचा प्रस्ताव ड्रग ॲथॉरिटी ऑफ इंडियाला सादर केला होता.

  ती परवानगी मंगळवारी मिळाली असून तसे अधिकृत पत्र रुग्णालयाला प्राप्त झाले आहे. आता रुग्णालयाच्या समितीद्वारे क्लिनिकल ट्रायलच्या तयारीच्या दृष्टीने सर्वस्तरावर चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर समितीचा निर्णय होताच, २ ते १८ दरम्यानच्या तीन गटातील प्रत्येकी २५ मुलांचा समावेश करण्यात येईल. यामध्ये २ ते ६, ६ ते १२ आणि १२ ते १८ वयोगटातील सुदृढ आरोग्य असलेल्या मुलांची समितीद्वारे निवड करण्यात येणार आहे.

  प्रत्यक्ष क्लिनिकल ट्रायल सुरू करण्यासाठी किमान महिनाभराचा अवधी लागेल असे डॉ. पालतेवार म्हणाले. यापूर्वी मेडिट्रिना रुग्णालयाने कोव्हॅक्सिनची ट्रायल घेतली आहे. नागपुरातील बालरोग तज्ज्ञ डॉ. वसंत खडतकर यांच्या मार्गदर्शनात डॉ. आनंद राठी, डॉ. आशीष ताजने यांच्यासह पाच जणांच्या पथकाच्या निरीक्षणात ही क्लिनिकल ट्रायल होणार आहे.

  इच्छुकांची रीतसर नोंदणी करावी
  क्लिनिकल ट्रायलची परवानगी मिळाल्यानंतर भारत बायोटेककडून लशींचा पुरवठा होईल. रुग्णालयाला लशीच्या कुप्या प्राप्त झाल्यानंतर क्लिनिकल ट्रायलविषयी कळवण्यात येईल. लसीकरणाच्या ट्रायलमध्ये सहभागी होण्यास इच्छुकांची रीतसर नोंदणी करून आरोग्य तपासणी करण्यात येईल. यानंतर कंपनीच्या प्रोटोकॉलनुसार त्यांचे संमतिपत्र घेऊन या चाचणी करण्यात येतील.