प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विवाह सोहळ्यासाठी 50 जणांची उपस्थितीची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक नवरदेवांचा हिरमोड झाला आहे. अनेकांनी तर घोडा, बॅन्ड यासह काहींनी सभागृह सुद्धा रद्द केल्याचे दिसून येत आहे.

  • घोड्यावर बसून मिरवायची संधीही हुकली; बॅन्डही केला रद्द

नागपूर (Nagpur). कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने विवाह सोहळ्यासाठी 50 जणांची उपस्थितीची परवानगी दिली आहे. त्यामुळे अनेक नवरदेवांचा हिरमोड झाला आहे. अनेकांनी तर घोडा, बॅन्ड यासह काहींनी सभागृह सुद्धा रद्द केल्याचे दिसून येत आहे.

मागील लॉकडाऊनमध्ये साध्या पद्धतीने विवाह करणारे लॉकडाऊन उठल्यानंतर मात्र धामधूममध्ये लग्न करायचं या इराद्याने मैदानात उतरले होते. दरम्यान कित्येक विवाह सोहळे हे हजारो लोकांच्या उपस्थितीत पार सुद्धा पडले. त्यावेळी तशी परवानगी होती. यावेळेला आपण धुमधडाक्यात लग्न करु, यासाठी अनेकांनी डिजे, घोडा, बॅन्ड व गाड्या यासह मंगल कार्यालय बुक केले होते; परंतु अचानक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हाधिकारी यांनी नुकताच नवीन आदेश लागू केले. त्यामुळे वधु-वराकडील असे दोन्ही मिळून फक्त 50 जणांच्या उपस्थितीतच लग्नाचा कार्यक्रम उरकुन घ्यावा लागणार आहे.

ज्या वधु-वरांकडील मंडळींनी लग्नाची तयारी केली होती, त्यांचा मात्र पुरता हिरमोड झाल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. अनेक वधुपित्यांनी मंगल कार्यालये रद्द केली तर काहींनी जे झालं ते चांगलंच झालं, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.