मॉल प्रवेशासाठी दोन्ही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची अट; नागरिकांची नाराजी

अनेकांजवळ भेट वस्तूच्या स्वरूपात मिळालेले मॉलमधील खरेदीचे कुपन आहेत. ते वेळेत खर्च करावे लागतात. त्यांची मुदत गेल्यास ते कुपन निरुपयोगी ठरतात. त्यामुळे ज्यांनी दुसरी मात्र घेतलेली नाही त्यांना या कुपनचा उपयोग प्रत्यक्ष खरेदी न करता ऑनलाईन शॉपिंगद्वारे करावा लागत आहे.

    नागपूर (Nagpur) : तब्बल सहा महिन्यांपासून बंद असलेले शहरातील मॉल (The city’s malls) अखेर सुरू झालेत; मात्र मॉलमध्ये केवळ कोरोना लसीची दुसरी मात्रा (the second dose of Corona vaccine) घेतलेल्यांनाच प्रवेश देत असल्याने नागपूरकरांमध्ये नाराजी पसरली आहे. (The Entry Rules In Mall )

    सुरक्षारक्षक (The security guard) प्रत्येक ग्राहकांचे दुसरी मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र तपासूनच मॉलमध्ये प्रवेश देत आहे; मात्र यामध्ये सर्वाधिक अडचण लहान मुलांची होत आहे. देशात लहान मुलांची करोना प्रतिबंधक लस अजून आली नसल्याने बहुतांश मुलांना मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात येत आहे. त्यामुळे पालकांसोबत खरेदीला आलेल्या मुलांचा हिरमोड होत आहे. त्याशिवाय अनेकांजवळ भेट वस्तूच्या स्वरूपात मिळालेले मॉलमधील खरेदीचे कुपन आहेत. ते वेळेत खर्च करावे लागतात.

    त्यांची मुदत गेल्यास ते कुपन निरुपयोगी ठरतात. त्यामुळे ज्यांनी दुसरी मात्र घेतलेली नाही त्यांना या कुपनचा उपयोग प्रत्यक्ष खरेदी न करता ऑनलाईन शॉपिंगद्वारे करावा लागत आहे. अनेक महिन्यांनी मॉल सुरू झाल्याने शहरातील प्रत्येक मॉलबाहेर खरेदीसाठी नागरिकांच्या मोठय़ा रांगा लागल्या आहेत. तेथे येणाऱ्यांची सुरक्षारक्षकांकडून दुसरी लस घेतल्याची तपासणी सुरू आहे.