काॅंग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी
काॅंग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी

भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये अलीकडेच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाचा निवडणुकीचा दुसऱ्या पसंतीच्या फेरीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये काॅंग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी ६१ हजार ७०१ मते घेत त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना १८ हजार ७१० मतांनी पराभूत केले आहे.

  • महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी

नागपूर (Nagpur). भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये अलीकडेच पार पडलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाचा निवडणुकीचा दुसऱ्या पसंतीच्या फेरीचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला. यामध्ये काॅंग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी ६१ हजार ७०१ मते घेत त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना १८ हजार ७१० मतांनी पराभूत केले आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जोशी यांना दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या फेरीत ४२ हजार ९९१ मते मिळाली. संदीप जोशी हे नागपूर शहराचे महापौर असून त्यांना निवडणुकीत जिंकविण्यासाठी भाजप आणि रा.स्व.संघाने एकेरी मोट बांधली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या एकशक्तीपुढे त्यांना टीकाव लागला नाही. पदवीधर तरुणाईने अभिजीत वंजारी यांना सर्वाधिक कल देऊन विधानपरिषदेच्या आमदार पदाची माळ त्यांचा गळ्यात घातली.