helth insurance in nagpur

नागपूर. मार्च महिन्यापासून सातत्याने वाढत चाललेल्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड धास्तावळे आहेत. या भीतीवर तोडगा म्हणून पारशिवनी तालुक्‍्याव्यतिरिकक्‍त इतर शाक्त ग्रामीण भागातील अनेक नी आपला मेडिक्लेम तसेच आयुर्विमा वाढवून घेतला आहे. किंवा ज्यांच्याकडे यापूर्वी हे दोन्ही विमा नव्हते, त्यांनी नवीन विमा मिळवत स्वतःसाठी सुरक्षेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोरोना वाढीच्या प्रमाणात चौपट ते पाचपटीने बाढ झाली आहे. मार्च अखेर आणि एप्रिलमध्ये काही नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर मात्र हा वेग मोठ्या प्रमाणात वाढल. मेपर्यंत कोरोनाचे प्रमाण कमी होईल.

अशी शक्‍यता वर्तवली जात असतानाच ऐन पावसाळ्यात कोरोनाने धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला. त्यामुळे मे महिन्याचा अखेरीस तसेच त्यानंतरच्या तीन महिन्यात कोरोनापासून सुरक्षितता मिळवण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या उपाययोजनांना नागरिकांनी प्राथमिकता दिली. त्यात स्वच्छता, मास्क आणि आहारात केलेल्या बदलाबरोबरच आवश्यकता भासल्यास कमी पडू नये म्हणून मेडिक्लेमचादेखील अवलंब केला.ज्यांच्याकडे कोणत्या कंपनीचा मेडिक्लेम नव्हता त्यांनी त्यातल्या त्यात कमी दराचे असणारे कंपन्यांचे मेडिक्लेम स्वीकारण्याचा पवित्रा घेतल.

तर समजा काही बरे-वाईट झाले तर निदान आपल्या कुटुंबाला त्याचा फटका बसू नये, या उद्देशाने अनेक नागरिकांनी आयुर्विमादेखील काढण्याला प्राधान्य दिले. ज्यांच्याकडे हे दोन्ही बिमा होते, त्यांनी त्याच्या रकमेत वाढ करण्याचा किंवा नवीन अजून एक विमा स्वीकारत आपल्या भविष्यातील सुरक्षिततेचा मार्ग अवलंबला. त्यासाठी अनेक नागरिकांनी कोविड विम्याचा पर्याय स्वीकारत खबरदारी घेतली. कोबिडचा विमा हा नऊ महिन्यांसाठी असल्याने त्याचा दर काहीसा कमी आहे. सर्व आजार कव्हर करणाऱ्या अन्य पॉलिसीतही या आजारावर उपचार शक्‍य आहेत.

मात्र नागरिक कोरोनाच्या प्रभावामुळे आधीच भयभीत झालेले आहेत, त्यामुळे कोरोना विमा घेण्याला त्यांच्याकडून प्राधान्य दिले जात आहे. या विम्याचा मंजुरीचा कालावधी पंधरा दिवसांचा आहे. तसेच कोणत्याही बयोगटातील व्यक्‍तीला हा बिमा काढता येऊ शकतो. नागपूर जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात या आरोग्य विमा काढण्याचे प्रमाण चारपटीने तर आयुर्विमा काढण्याच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाली असल्याचे आयुर्बिमाचे एजंटकडून कळते.