नागपुरात बुधवारी ५३३८ नवीन कोरोना रुग्ण आढळले; ६६ जणांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा (कोविड-19) प्रादुर्भाव जोमाने वाढत आहे. उपराजधानीत बुधवारी 5338 नवीन कोरोना रुग्णांची नोंदणी करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावाचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आकडा आहे.

    नागपूर (Nagpur).  नागपूर जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा (कोविड-19) प्रादुर्भाव जोमाने वाढत आहे. उपराजधानीत बुधवारी 5338 नवीन कोरोना रुग्णांची नोंदणी करण्यात आली. कोरोना प्रादुर्भावाचा हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा आकडा आहे. कोरोनामुळे आज 66 रुग्णांचा मृत्यूही झाला.

    ताज्या माहितीप्रमाणे, नागपूर जिल्ह्यातील आजपर्यंतची एकूण कोरोना बाधितांची संख्या 2.54 लाख इतकी नोंदविण्यात आली. एकूण मृत्यूसंख्या 5504 इतक्यावर पोहोचली आहे. अधिकृत अहवालानुसार एकूण कोरोना पाॅझिटिव्ह घटकांपैकी २,०48. ग्रामीण भागातील आणि 3283 केसेस एकट्या नागपूर शहरातील आहेत, तर सात प्रकरणे जिल्ह्याबाहेरील नोंदविण्यात आली आहेत.

    दरम्यान, एकूण मृतकांपैकी 34 जण नागपूर शहरातून, सात मृतक नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. 25 मृतक नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आहेत. ताज्या माहितीनुसार, शहरातील एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 42 हजार 933 जणांना घरातच विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे. बुधवारी एका दिवसात 3868 जण कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे.