न्यायाधिशांसह १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नागपूर - कोरोना देशात धूमाकूळ घालत आहे. देशात सर्वच राज्यात कोरोनाचा प्रकोप झाल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला होता. ३ महिन्याच्या

 नागपूर – कोरोना देशात धूमाकूळ घालत आहे. देशात सर्वच राज्यात कोरोनाचा प्रकोप झाल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात २२ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला होता. ३ महिन्याच्या कालावधीनंतर आता अनलॉक होत असताना कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागपुर रेड झोनमधून ग्रीन झोन मध्ये वाटचाल यशस्वी झाली होती. तोच परत कोरोनाचा उद्रेक झाला आणि बघताच बाधितांचा आकडा वाढायला लागला. आता नागपूरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा १२७० इतका झाला आहे. नागपूरमधील न्यायालयाच्या दारात कोरोना पोहोचला आहे. कोर्ट क्रमांक ८ च्या न्याधिशांसह १० कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यांना विलगीकरणात ठेवले आहे. 

शनिवारी नागपुरात ६७ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी बहुतेक नागरिक हे विलगिकरणात आणि संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आलेले संशयितांचे आहेत. त्यातच नायालयातील न्याय़ाधिशांसह १० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवाल आले आहेत. संपुर्ण न्यायालय सील करण्यात आले आहे. नागपुरात कोरोनाचा प्रकोप अधिकच होत असल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत.