नागपुरात कोरोनामुळे ११२ जणांचा मृत्यू, नियमांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे मृतांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. नागपुरात आज रविवारी कोरोनामुळे १०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

    नागपूर (Nagpur).  कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे मृतांची संख्या सातत्याने वाढत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. नागपुरात आज रविवारी कोरोनामुळे 100 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. त्याचप्रमाणे 5007 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

    वैद्यकीय उपचारांमुळे आतापर्यंत 6376 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याऱ्यांची एकूण संख्या 3.37 लाख आहे. कोरोना अहवालाच्या ताज्या आकडेवारीनुसार एकूण कोरोना बाधितांची आतापर्यंतची संख्या 4.19 लाख नोंदविण्यात आली. या आजारामुळे नागपूर जिल्ह्यात एकूण 7599 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 18 हजार 629 व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.