प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांचे नियमांकडील दुर्लक्ष या गोष्टीं लक्षात घेता राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. संध्याकाळी 6 ते सकाळचे 9 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे.

  • मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत

नागपूर (Nagpur).  राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांचे नियमांकडील दुर्लक्ष या गोष्टीं लक्षात घेता राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. तसे स्पष्ट संकेत मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. संध्याकाळी 6 ते सकाळचे 9 या वेळेत नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता आहे.

राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक अशा मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाला थोपवण्याठी राज्य सरकार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्याचे आवाहन करत असले तरी नागरिकांकडून नियम पायदळी तुडवले जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे, असे संकेत त्यांनी दिले.

मास्क लावणे, गर्दी टाळणे या गोष्टी नागरिकांनी पाळाव्यात. लग्न समारंभात गर्दी टाळण्यासाठी आम्ही आता मंगल कार्यालयांवर कारवाई करण्याचे सुरू केले आहे. साधारणत: संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लावण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू आहे. जर लोकांनी सुरक्षेची काळजी घेतली नाही, तर लॉकडाऊनची वेळ येऊ शकते. - विजय वडेट्टीवार, भूकंप व पुनर्वसन मंत्री

जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार (Powers to the Collector)
नाईट कर्फ्यूचे संकेत दिल्यानंतर राज्यात एकाच वेळी कर्फ्यू लागू केला जाणार का?, असा प्रश्न नागिरकांना पडत आहे. याविषयी बोलताना राज्यभर कर्फ्यू लागू करण्यापेक्षा त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या संबंधीचे अधीकार दिले आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितलं. तसेच, प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या, कोरोनाचा प्रसार, होणारी गर्दी या सर्व गोष्टी लक्षात घेऊन नाईट कर्फ्यू संदर्भात तेथील जिल्हाधिकारी निर्णय घेतील. तसे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार दिले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.