नागपुरात सोमवारी आढळला ०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; Coronaला हरविण्यात नागपुरकरांचा मोठा सहभाग

    नागपूर (Nagpur) : मनपा प्रशासनाच्या (the municipal administration) आरोग्य विभागाने (The health department) कोरोनाची संभाव्य तिसरी लाट (third wave of corona) रोखण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या (the number of corona patients) शून्यावर आणणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे.

    नागपूर शहरात सोमवारी केवळ ०१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. मात्र एकही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आरोग्य विभागाला प्राप्त झाली नाही. शहरात Corona Active रुग्णांचे प्रमाणही घटल्याचे जाणवून आले. आज केवळ ६७ कोरोना Active रुग्ण आढळले. जेव्हा की, रविवारी Corona Active रुग्णांची आकडेवारी ७५ इतकी नोंदविण्यात आली होती. योग्य उपचारांमुळे नागपुरातील ०९ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. एकूण आकडेवारी बघता शहरातील आतापर्यंत ०३ लाख ४० हजार ८० रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. शहरात सोमवारी १५४२ रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.

    नागपूर मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरात सोमवारपर्यंत ११ लाख १८ हजार ०१९ रुग्णांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. याप्रमाणे ०४ लाख ६५ हजार ९७६ रुग्णांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली. शहरातील एकूण लसीकरणाची आकडेवारी १५ लाख ८३ हजार ९९५ इतकी नोंदविण्यात आली.